Ahilyangar Flood : लेकासाठी बाप निसर्गाशी लढला; पुरातूनही वाट काढत दवाखाना गाठला

Ahilyangar Flood update : नगरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक गावात कमरे पाणी साचलं आहे. या पावसातही एका बापाने मुलाला दवाखान्यात नेलं.
Ahilyangar Flood
Ahilyangar Flood update Saam tv
Published On
Summary

पाथर्डीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

एका वडिलांचा मुलासाठी कमरेभर पाण्यातून दवाखान्याचा प्रवास

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी

सुशील थोरात, साम टीव्ही

राज्यातील विविध भागात पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुले पिकांना मोठा फटका बसला आहे. तर राज्यातील काही भागात कमरे एवढ्या पाणी साचलं आहे. कोसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. याच मुसळधार पावसातही एका बापाने जीवघेणा प्रवास करून मुलाला दवाखान्यात नेलं. या बापाने मुलासाठी केलेल्या धडपडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील आहे.

Ahilyangar Flood
Famous Actress Mother Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात म्हणजेच शेवगाव ,पाथर्डी आणि जामखेड भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने ग्रामस्थांना कसरत करत आहेत. तर काही ठिकाणी जीवघेणा प्रवास करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे. पाथर्डी तालुक्याला पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत.

Ahilyangar Flood
Kalyan APMC Market : कल्याणमध्ये घोटाळ्याचा बाजार; समितीत आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा

अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तर लहान चिमुकल्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कमेरे एवढ्या पाण्यातून कसरत करत वडील लहान चिमुकल्याला दवाखान्यात नेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. ग्रामीण भागात अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर सर्व ठिकाणी जाऊन रस्ते दुरुस्त करून अथवा पर्यायी रस्ते खुले करून द्यावेत, असे मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Ahilyangar Flood
Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

धरणाचे स्वयंचलित गेट उघडले, पैनगंगा नदीकाठावरील गावांचं नुकसान

बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान झालंय. पैनगंगा नदीवर असलेले येळगाव धरणाचे गेट स्वयंचलित आहेत. त्यामुळे धरण भरल्यानंतर ते गेट उघडले जातात. त्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येतो आणि नदीकाठी असलेल्या शेतात पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान होते. ते गेट मानवनिर्मित करावे, तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत शेतकरी आज सकाळपासून शेतातच साचलेला पाण्यात आंदोलनाला बसले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com