Ladakh Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय पेटवलं, कुठे घडली घटना?

Ladakh Protest News : लडाखमध्ये स्थानिकांचं आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलंकांनी भाजप कार्यालय पेटवलं आहे.
Ladakh Protest
Ladakh Protest NewsSaam tv
Published On

केंद्रशासित प्रदेश लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी स्थानिकांकडून तीव्र आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाला. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी लेहमधील भाजप कार्यालय पेटवलं. तर सीआरपीएफच्या गाड्या देखील पेटवण्यात आल्या आहेत.

Ladakh Protest
Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

लडाखला पूर्ण राज्याचा देण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या १५ दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत. लडाखच्या लेह शहारात आज सकाळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. सीआरपीएफच्या गाड्या देखील पेटवून दिल्या. या आंदोलनाला पहिल्यांदा हिंसक वळण लागल्याचं सांगण्यात येत आहे.

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये सामावेश व्हावा, यासाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला बुधवारी १४ दिवस पूर्ण झाले. या आंदोलनादरम्यान दोन महिला बेशुद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Ladakh Protest
RPI Worker Clash : रामदास आठवलेंच्या पक्षात मोठा राडा; अध्यक्षपदावरून २ गटात तुफान हाणामारी, खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या

अंचुक आणि अंचुक डोल्मा या दोन महिला बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना जवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी लेह हिल परिषदेच्या इमारतीवर दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलं आहे.

आंदोलकांनी लेहमधील भाजप कार्यालयावर देखील हल्ला केला. काहींनी सुरक्षाकर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. तर काही आंदोलकांनी भाजपचं कार्यालयच पेटवून दिलं. त्यानंतर लडाखमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Ladakh Protest
Bhiwandi Nizampur Municipal Corporation : भिवंडी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? मुस्लिम मते गेमचेंजर ठरणार

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने याचा निर्णय ६ ऑक्टोबर रोजी घेणार असल्याचं बोललं आहे. मात्र, केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. लडाखमधील लोक अधिक वेळ वाट पाहू शकत नाही, असं आंदोलकांचं म्हणणं आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून आंदोलन सुरु आहे. यात पुरुष, महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आंदोलकाकडून लडाखला संविधानिक संरक्षण आणि राजकीय अधिकारांची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com