ST Bus: राज्यातील ३४ आगार प्रमुखांवर होणार कारवाई, प्रताप सरनाईकांचे आदेश; नेमकं कारण काय?

34 ST Bus Managers Punished: राज्यातील ३४ एसटी बस आगार प्रमुखांवर कारवाई होणार आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचे राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात उपस्थित न राहिलेल्या एसटी आगार प्रमुखांना दणका देण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगारप्रमुखांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे या आगारप्रमुखांवर कारवाई करण्यात याव्यात अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्यामुळे या आगारप्रमुखांना चांगलाच धक्का बसला आहे. यापुढे बेजबाबदार वर्तन भविष्यात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम देखील प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com