Siddhi Hande
नाश्त्याला रोज काय बनवावा असा प्रश्न महिलांना पडलेला असतो. त्यात काहीतरी चटपटीत खायला सर्वांनाच आवडते.
तुम्ही घरी मिरची वडा बनवू शकतात. मिरची पकोडा बनवण्याची रेसिपी वाचा.
जाड मिरच्या, बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, तिखट, सोडा, मीठ, तेल, बटाटे
सर्वात आधी तुम्हाला मिरच्या धुवून पुसून घ्यायच्या आहे. त्यातील आतील बिया काढून घ्या.
एका बाजूला सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरं मोहरीची फोडणी द्या.
आलं लसूण पेस्ट टाका. त्यात बटाटे मॅश करुन टाका. यात बडीशेप पावडर, आमचूर पावडर, मीठ, कोथिंबीर टाका.
यानंतर मिरच्या मधून कापून घ्या. त्यात हे सारण भरा.
एका वाटीत बेसन घ्या. त्यात मीठ, हिंग, सोडा टाकून मिक्स करा.
यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ही मिरची बेसनात बुडवून तळून घ्या.