ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

ST Reservation : एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक झालाय... त्यामुळं एसटी आरक्षणावरुन सरकारसमोर तिहेरी तिढा निर्माण झालाय... मात्र हा तिढा नेमका काय आहे? धनगर आरक्षणाची लढाई कधीपासून सुरुय.... पाहूयात...
ST Reservation news
ST ReservationSaam tv
Published On

बंजारा समाजापाठोपाठ आता धनगर समाजाने पुन्हा एकदा एसटी आरक्षणासाठी रणशिंग फुंकलंय...आदिवासी आरक्षणासाठी पारंपरिक वाद्यांसह धनगर समाजाने थेट बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलीय... तर जालन्यात धनगर समाजातर्फे दीपक बोऱ्हाडेंनी आमरण उपोषणाला सुरुवात केलीय.

तर जोपर्यंत धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी केलाय. खरंतर धनगर समाजाकडून मध्य प्रदेशातील धनगड आणि महाराष्ट्रातील धनगर एकच असल्याचा दावा करत आदिवासी आऱक्षणाची मागणी केली जातेय..त्याची कारणं काय आहेत.... पाहूयात.

मध्य प्रदेशात धनगड समाज ST प्रवर्गात

धनगर हा धनगडचा अपभ्रंश असल्याचा दावा

महाराष्ट्रात धनगर समाजाला भटक्या जमातीत (NT-C) मध्ये 3.5 टक्के आरक्षण

आदिवासी जमातींसाठी राज्यात 7 टक्के आरक्षण आहे.. त्यामुळे धनगर समाजाला आदिवासीमधून आऱक्षण हवं आहे

ST Reservation news
Maratha Reservation :...तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, आमच्या लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

धनगर समाजाची आदिवासीतून आरक्षणातून 1955 पासून मागणी आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने दोन वेळा केंद्राकडे शिफारस केली.. अनेक सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं.. मात्र धनगर समाजाला आरक्षण ST आरक्षण काही मिळालं नाही..तर धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा अहवाल उच्च न्यायालयाने फेटाळून लावलाय...v

ST Reservation news
Maratha Reservation :...तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, आमच्या लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

धनगर आणि धनगड हे वेगवेगळे असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं. संभाजीनगरमधील धनगड जातीचे दाखलेही कायम ठेवण्याचा निर्णय कोर्टाने दिला.. आता पुन्हा एकदा आरक्षणावरुन वातावरण तापलंय.. एसटीतून आरक्षणासाठी बंजारांपाठोपाठ धनगर समाज पुन्हा आक्रमक झाल्यामुळे सरकारसमोर तिहेरी तिढा निर्माण झालाय, कारण या दोघा समाजांच्या मागणीला आदिवासींचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता सरकार यावर कसा तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com