IAS Officer Pooja Khedkar  Saam Tv
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन उघड

Priya More

मंगेश कचरे, बारामती

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांचे बारामती कनेक्शन समोर आले आहे. पूजा खेडकर यांची बारामती तालुक्यात जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या नावावर ही जमीन आहे. पूजा खेडकर चर्चेत असताना आता खेडकर कुटुंबीयांनी ही जमीन विकण्यासाठी काढली आहे. पूजा खेडकर यांच्याबाबत एक एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आधीच त्यांच्या आईने शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता त्यांची बारामतीत जमीन असल्याची माहितीही समोर आली आहे.

पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची माहिती उघड केली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची १४ गुंठे जमीन असल्याची पोस्ट विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर केली आहे.

विजय कुंभार यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. बारामतीमध्ये असलेली जमीन आता खेडकर कुटुंबीयांनी विकायला काढली होती. वाघळवाडी येथील खेडकर कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत अंदाडे दीड कोटी रुपये इतकी आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक ८ मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर १४ गुंठे जमीन आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. मनोरमा खेडकर यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पिस्तूलाचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का? हे देखील तपासले जाणार आहे. तो व्हिडीओ कधीचा आहे हे तपासले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

SCROLL FOR NEXT