VIDEO: हातात पिस्तुल आणि शेतकऱ्याला धमकी, IAS अधिकारी Pooja Khedkar यांच्या मातोश्रींचा व्हिडीओ व्हायरल

Pooja Khedkar News: हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकवल्याचा मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल, पुजा खेडकर या संपत्तीवरुन आणि खासगी गाडीवरील लाल दिव्यावरुन वादात

वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मनोरमा खेडकर यांच्या या व्हिडीओची पुणे ग्रामीण पोलीसांकडून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुजा खेडकर या संपत्तीवरुन आणि खासगी गाडीवरील लाल दिव्यावरुन वादात आहेत आता व्हायरल झालेल्या ह्या व्हिडीओवरुन मनोरमा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com