Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीच्या वादातून गोळीबाराचा थरार, एक जण गंभीर जखमी; बारामती तालुक्यातील घटना
bailgada sharyat, bullock cart racesaam tv

Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीवरुन वाद, बारामती तालुक्यात गोळीबाराचा थरार; एक जण गंभीर जखमी

Pune Crime News: बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
Published on

पुणे, ता. २८ जून २०२४

बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीच्या वादातून गोळीबाराचा थरार, एक जण गंभीर जखमी; बारामती तालुक्यातील घटना
Pune News: पुण्यात बिल्डरने शेतकऱ्यावर पिस्तुल रोखले, जीवे मारण्याची दिली धमकी; धक्कादायक VIDEO आला समोर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. निंबुत येथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला.

गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता.. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला. रणजित निंबाळकर हे काल मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते.

Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीच्या वादातून गोळीबाराचा थरार, एक जण गंभीर जखमी; बारामती तालुक्यातील घटना
Maharashtra Politics: खबरदार! गटबाजी कराल तर खैर नाही, पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री, काँग्रेस हायकमांडचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा; VIDEO

यावेळी त्यांचा वाद झाला आणि याच्यातूनच गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी पोलिसांनी गौरव काकडे,सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि मुलगा गौतम काकडे याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीच्या वादातून गोळीबाराचा थरार, एक जण गंभीर जखमी; बारामती तालुक्यातील घटना
Maharashtra Politics: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजप पदाधिकारी थेट बोलला; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com