Maharashtra Politics: खबरदार! गटबाजी कराल तर खैर नाही, पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री, काँग्रेस हायकमांडचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा; VIDEO

Maharashtra Congress News: लोकसभा निवडणुकांनंतर मुंबई काँग्रेसमधील खदखद समोर आली असून वर्षा गायकवाड यांच्याबाबत दिल्ली हायकमांडकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सागंण्यात येत आहे.
Maharashtra Politics: खबरदार! गटबाजी कराल तर खैर नाही, पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री, काँग्रेस हायकमांडचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा; VIDEO
Rahul GandhiSaam Tv
Published On

सुनिल काळे, मुंबई|ता. २७ जून २०२४

लोकसभा निवडणुकांनंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबाबत काँग्रेसमधील काही नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी तक्रार केली आहे. यावरुनच काँग्रेस हायकमांड आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट इशारा दिला आहे. तसेच पक्ष सोडणाऱ्यांनाही पुन्हा न घेण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकांनंतर मुंबई काँग्रेसमधील खदखद समोर आली असून वर्षा गायकवाड यांच्याबाबत दिल्ली हायकमांडकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सागंण्यात येत आहे. याबाबत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा असे म्हणत गटबाजी करणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

कोणी पक्षविरोधी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा मुद्दा एका नेत्याने मांडला होता. याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी शिका-याची गोष्ट सांगत थेट इशारा दिला आहे. जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा असे राहुल गांधी म्हणालेत. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रभारी रमेश चन्नीथला यांना ४ जूलैला मुंबईत जाऊन हा वाद मिटवण्याचे आदेशही दिले आहेत.

Maharashtra Politics: खबरदार! गटबाजी कराल तर खैर नाही, पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री, काँग्रेस हायकमांडचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा; VIDEO
Maharashtra Assembly Session: विधानभवनात CM शिंदे-फडणवीस समोर येताच विरोधकांची हातवारे करून घोषणाबाजी, VIDEO

पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री!

दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यांनाही दिल्ली हायकमांडने मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पक्ष सोडून गेलेल्या नेत्याला पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नका असा आदेश राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना दिले आहेत.

Maharashtra Politics: खबरदार! गटबाजी कराल तर खैर नाही, पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री, काँग्रेस हायकमांडचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा; VIDEO
Sanjay Raut News : 'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक नाही', ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान!, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com