Sanjay Raut News : 'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक नाही', ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान!, VIDEO

Maharashtra Politics Latest News: १८ व्या लोकसभेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती झाल्यानंतर आजपासून संसदीय कामकाजाला सुरूवात होत आहे. दुसरीकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशनालाही सुरूवात होत आहे.
Sanjay Raut News: 'CM पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक होणार नाही', ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान!
sanjay Raut-Uddhav ThackeraySaam TV

दिल्ली, ता. २७ जून २०२४

लोकसभेनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवून मोठा भाऊ ठरलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागांची मागणी केली असतानाच खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"नव्या संसदेची आज रीतसर सुरुवात होत आहे. राष्ट्रपतींचे भाषण आज होईल. लोकसभा अल्प काळासाठी सुरू राहील. अल्पमताचे सरकार भाषणातून किती पाठ थोपटून घेत आहे हे पहावं लागेल. यावेळी लोकसभा पूर्ण वेगळी आहे त्याच प्रतिबिंब राज्यसभेत पाहायला मिळेल. कुबड्या घेतलेले पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आपल्याला दिसेल. सूंभ जळला तरी पिळ कायम आहे, तो पीळ आम्ही उतरवू," असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला.

तसेच "खोट्या नॅरेटिव्हचा पडदा फाडायचा असेल तर मोदी यांच्यापासून सुरू करावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच काय ते बोला आधीच काय काढता. पंतप्रधान मोदींनी पेपर फुटीवर बोलावं, याप्रकरणी ज्यांचा सहभाग आहे, त्या मंत्र्याने राजीनामा द्यायला पाहिजे," अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.

Sanjay Raut News: 'CM पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक होणार नाही', ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान!
Pune Accident News: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅक्टर- कारची समोरासमोर धडक; १ ठार, ३ जखमी

"विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा लागेल. लोकांना चेहरा द्यावाच लागणार आहे. बिनचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पाहिलं आहे, असे म्हणत आगामी विधानसभा निवडणूकांबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.

Sanjay Raut News: 'CM पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक होणार नाही', ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान!
Pune Metro: गुड न्यूज! पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकारक होणार, स्वारगेटपर्यंतची मेट्रोसेवा गणेशोत्सवाआधी होणार सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com