PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींना दररोज करावा लागणार राम-राम

PM Modi Namaste To Rahul Gandhi: कौन राहुल? असं चेष्टेने विचारणाऱ्या पंतप्रधान मोदींना आता दररोज चक्क राहुल गांधींना राम राम करावा लागणार आहे. पण हे नेमकं कसं शक्य झालंय? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींना दररोज करावा लागणार राम-राम
PM Modi Namaste To Rahul Gandhi

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

हे संसदेतील चित्र तुम्हाला यापुढं नेहमी पाहायला मिळू शकतं. कारण राहुल गांधी लोकसभेचे नवे विरोधी पक्षनेते बनलेत. कौन राहुल? असं मोदी राहुल गांधींविषयी चेष्टेने बोलले होते. त्यामुळेच एकेकाळी राहुल गांधींची अशी चेष्टा करणाऱ्या पंतप्रधान मोदींना आता राहुल गांधींना रोजच राम राम करावा लागणार असल्याचा टोला संजय राऊतांनी हाणलाय.

एरवी गरजेपेक्षा कोणालाही जास्त महत्व न देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी चक्क राहुल गांधींशी हस्तांदोलन केल्याची चर्चा देशभर रंगलीय. पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांना परंपरेप्रमाणे आसनाकडे घेऊन गेले. त्यावेळी चक्क पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींशी हस्तांदोलन केलं.

त्यामुळे पप्पू म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांचं संसदेतील वजन काय असणार याची प्रचिती आली. इंडिया आघाडीने लोकांचा आवाज बनण्यासाठी दिलेल्या जबाबदारीला राहुल गांधी कितपत न्याय देतात? आणि सरकारला कोंडीत कसं पक़डतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींना दररोज करावा लागणार राम-राम
Parliament Speaker Salary: लोकसभा अध्यक्षांचा पगार किती असतो? कोणत्या मिळतात सुविधा जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com