OM Birla Lok Sabha Speaker: ओम बिर्ला पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी; INDIA आघाडीच्या के. सुरेश यांचा कसा झाला पराभव?

OM Birla Won Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी आज संसदेत आवाजी मतदान पार पडले. यामध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला निवडून आले आहेत.
OM Birla Lok Sabha Speaker: ओम बिर्ला पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी; INDIA आघाडीच्या के. सुरेश यांचा कसा झाला पराभव?
OM Birla, Lok Sabha New SpeakerSaam TV

लोकसभा अध्यक्षपदासाठी आज संसदेत आवाजी मतदान पार पडले. यामध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार के. सुरेश यांचा पराभव केला आहे. बिर्ला यांच्या नावाला तब्बल १३ पक्षांनी पाठिंबा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या प्रस्तावाला इंडिया आघाडीच्या खासदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर संसदेत आवाजी मतदान घेण्यात आले. यावेळी १३ पक्षांनी ओम बिर्ला यांच्या नावाने मतदान केले.

दुसरीकडे के. सुरेश यांच्या नावाला कमी पक्षांनी पसंती दिली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला (OM Birla) निवडून आलेत. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदी निवड होताच पंतप्रधान मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परंपरेनुसार ओम बिर्ला यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केले.

आता ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदाची (Lok Sabha Speaker Election) जबाबदारी स्वीकारणार आहेत. दुसरीकडे बिर्ला यांची निवड होताच प्रोटेम स्पीकर भृथरी महताब यांना प्रोटेम स्पीकरच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. यंदा इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी आवाजी मतदान घेण्यात आलंय. आतापर्यंत लोकसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध केली जात होती.

दरम्यान, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. भलेही एनडीएकडे केंद्रात सत्ता आहे पण आम्ही लोकांचे प्रतिनिधीत्व करतो. या सभागृहात विरोधकांचा आवाज ऐकला जाणे आवश्यक आहे. मला आशा आहे की तुम्ही आम्हाला बोलू द्याल. विरोधकांचा आवाज दाबणे हे अलोकतांत्रिक आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

OM Birla Lok Sabha Speaker: ओम बिर्ला पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी; INDIA आघाडीच्या के. सुरेश यांचा कसा झाला पराभव?
Maharashtra Politics: मोठी बातमी! विधानसभेसाठी महाविकास आघाडी मास्टर प्लान; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवणार? पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com