वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनंतर केंद्र सरकारद्वारे पूजा खेडकर यांची चौकशी होणार आहे. पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवला मागवण्यात आल्याची माहिती काल समोर आली होती. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने (LBSNAA) महाराष्ट्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्याबद्दल अहवाल मागवला होता. LBSNAA अहवाल तपासून अंतिम रिपोर्ट यूपीएससी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींनंतर आता पूजा खेडकर यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने समितीची स्थापना केली आहे. या संदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनीही खासगी कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणुकीबाबतचा तपशीलवार अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आला आहे.
खासगी कारवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत. हा वाद आता पूजा खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचला आहे. पूजा खेडकर यांची आता चौकशी होणार आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी काल पुणे पोलिसांचे पथक त्यांच्या पाषाण येथील निवासस्थानी गेले होते. पण त्यांच्या बंगल्याचा गेट बंद होता. त्यांच्या आईने गेट उघडला नाही उलट पोलिसांनाच दमदाटी केली आणि माध्यमांचे कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पूजा खेडकर यांचे पुण्यातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल सोसायटीमध्ये आलिशान बंगला आहे. त्यांच्या बंगल्याचा आवारात अनेक आलिशान कार आहेत. पूजा खेडकर यांनी स्वत:च्या ऑडी बेकायदेशीरपणे लाल दिवा लावला आहे. याप्रकरणी त्यांची पुणे पोलिस चौकशी करणार आहेत. पूजा खेडकर यांनी या कारवर 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी देखील लावली आहे. मोटर वाहन नियम या कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.