IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्या भलत्याच 'डीमांड'; जॉइन होण्याआधीच हवी होती कार, समोर आले WhatsApp चॅट

IAS Pooja Khedkar Whats App Chat: पूजा खेडकर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत. पूजा यांनी UPSC परीक्षेत ऑल इंडिया रँक ८४१ मिळवला होता.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSaam Digital
Published On

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

देशातील अनेक आयएएस आणि आयपीएस अनेकदा चर्चेत असतात. काही त्यांच्या चांगल्या कामांमुळे तर काही वादात सापडल्यानंतर आयएएस अधिकारी चर्चत येत असतात. सध्या राज्यातील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवस यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांची तक्रार केली होती. त्यानंतर पूजा यांची वाशिमला बदली झाली. पूजा यांना वाशिम जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी बनवण्यात आलंय.

लाल-निळे दिवे वैयक्तिक ऑडी कार आणि व्हीआयपी नंबर प्लेट अधिकृत म्हणून वापरल्याने प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर ह्या चर्चेत आलेत. दरम्यान पूजा खेडकर यांची चर्चा ही एका अगळ्या वेगळ्या मागण्यामुळे अधिक होऊ लागली. त्यांनी केलेल्या मागण्या आयएएस संवर्गातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना दिल्या जात नाहीत.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेल्या रिपोर्टनुसार प्रशिक्षणार्थी म्हणून कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच पूजा ह्यांनी स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना या सुविधा देण्यास नकार देण्यात आला.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केलेला रिपोर्ट आता समोर आलाय. त्यात खेडकर यांच्या वर्तणुकीची पुराव्यांसह माहिती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पूजा यांनी निवासी जिल्हाकाऱ्यांशी केलेल्या व्हॉट्स अॅप चॅटचे डिटेल्सही जोडण्यात आलेत. या अहवालात पूजा यांच्या वर्तणुकीबाबतची माहिती देण्यात आलीय.

काय आहे या रिपोर्टमध्ये ?

पूजा यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना जॉईन होण्यापूर्वी काही मेसेज केले आहेत. या मेसेजमध्ये पूजा यांनी  जॉईन होण्यापूर्वीच कार आणि केबिनची मागणी केली होती. त्यावर जॉईन झाल्यावर निर्णय घेऊ असे उत्तर निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र त्यावर समाधानी न होता हे आधी व्हायला हवे अशी पूजा यांची मागणी होती. 

दरम्यान अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमधले सामान बाहेर काढून त्यांनी स्वतंत्र टेबल, संगणक, नावाची पाटी आणि इतर सामान ठेवण्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. शिवाय फोटोही जोडलेले आहेत. त्यामुळे खासगी गाडीला लाल दिवा लावणे, आरक्षणाचा नियमबाह्य लाभ घेणे यासोबतच प्रशिक्षण काळातील वर्तणुकीवरूनही पूजा खेडकर अडचणीत येणार आहेत.

पूजा खेडकर यांच्या बंगल्यात ठेवण्यात आलेल्या ऑडी कार पुजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी वापरत होत्या. यावर त्यांनी महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती आणि नारिंगी रंगाचा दिवा लावला होता. पोलिसांच्या मते हा वाहतूक नियमांचा भंग असून पोलिसांनी १७७ अंतर्गत कारवाई कारवाई करायचं ठरवलंय. त्यासाठी पुणे पोलीस खेडकर यांच्या बाणेर रस्त्यावरील बंगल्यासमोर आले होते, त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com