IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरच्या वडिलांनी लढवली होती लोकसभा निवडणूक; कोण होतं विरोधात? काय म्हणाले वाचा सविस्तर

IAS Officer Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी निलेश लंके यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. खासदार निलेश लंके यांनी आज पूजा खेडकर प्रतिक्रिया दिली आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSaam Digital
Published On

राज्यात सध्या IAS अधिकारी पूजा खेडकरचे करनामे ऐकून संपूर्ण प्रशासन हादरलं आहे. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी निलेश लंके यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. यावर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आणि पूजा खेडकर यांचा विषय वेगवेगळा आहे, मात्र कुठल्याही अधिकाऱ्यांनी असं वर्तन करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हलटं आहे.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

कोण आहेत दिलीप खेडकर?

दिलीप खेडकर आणि त्यांचे भाऊ माणिक खेडकर यांना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावे असं वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी मोहटादेवीला साकडं घातलं होतं. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर देवीला दीड किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण करू असं म्हटलं होतं. पंकजा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांनी आपलं साकडं पूर्ण केलं होतं.

खेडकर यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी होते. भालगावमधून भाजप उमेदवार सुजय विखे यांना स्थानिकांनी विरोध केला होता. गावातूनच खासदाराला विरोध झाला असल्याने माणिक खेडकर यांचे तालुकाध्यपद काढून घेतल्याची चर्चा होती. त्यावेळी विखे आणि खेडकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला .

IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांविरोधात होणार कारवाई, पुणे पोलीस बंगल्यावरच धडकले

लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना दिलीप खेडकर यांनी आपली संपत्ती ४० कोटी असल्याचं म्हटलं होतं. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे. एक सरकारी अधिकारी असताना त्यांनी कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. खेडकर कुटुंबियांकडे १०० एकर जमीन असल्याची माहिती आहे. आता पूजा खेडकर यांच्यामुळे खेडकर कुटुंबीय पुन्हा चर्चेत आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com