Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

IAS Officer Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस ऑफिसर पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवण्यात आला आहे.
Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
IAS Pooja KhedkarSaam Tv

अक्षय बडवे, पुणे

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातून त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. त्यानंतर आता पूजा खेडकर यांचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवला आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने (LBSNAA) महाराष्ट्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्याबद्दल अहवाल मागवला आहे. LBSNAA अहवाल तपासून अंतिम रिपोर्ट यूपीएससी यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. आयएएस होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचे प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी दिले होते. त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
IAS Pooja Khedkar : पुजाची हेराफेरी?, आयएएस अधिकारी पुजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्रंही बनावट; उत्पन्न 40 कोटी, तरी OBCमधून नियुक्ती?

पूजा खेडकर यांचे एकएक कारनामे समोर येताच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून तडकाफडकी त्यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस म्हणून बदली करण्यात आली. आज पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. त्यांनी जिल्हाधिकारी एस. बुवनेश्वरी यांची भेट घेतली. मीडियातून होत असलेल्या आरोपावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी आरोपाबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराईज नसल्याचे स्पष्टीकरण दिले. वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंद आहे. पुढील वर्षभर काम करत राहील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
IAS Pooja Khedkar Property & Income News : पूजा खेडकरांची संपत्ती, 17 कोटी तर 42 लाख रुपयांचे उत्पन्न

दरम्यान, पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना प्रोबेशनरी आयएएस म्हणून काम करत असताना पूजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच त्यांनी स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही हट्ट केला होता. त्याबरोबरच त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी केली. यामुळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी पूजा खेडकरचा प्रोबेशन काळ संपवून त्यांना दुसरीकडे बदली देण्याची मागणी केली होती.

या घटनेनंतर पूजा खेडकरचे एक एक कारनामे समोर यायला सुरुवात झाली. पूजा खेडकर यांना १७ कोटींच्या मालमत्तेतून ४२ लाखांचं उत्पन्न मिळतं. तर वडीलांच्या नावावर ४० कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून युपीएससीला अर्ज भरताना ८ लाख रुपयांची नॉन क्रिमीलेअर मर्यादा असतानाही कोट्यावधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांना चुकीची माहिती देऊन आयएएस पदी नियुक्त्ती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आता तर थेट पंतप्रधान कार्यालयातून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडणीत वाढ झाली आहे.

Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
Special Report : IAS Pooja Khedekar वादाच्या भोवऱ्यात, उत्पन्न 40 कोटी तरी OBCमधून नियुक्ती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com