IAS Pooja Khedkar : पुजाची हेराफेरी?, आयएएस अधिकारी पुजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्रंही बनावट; उत्पन्न 40 कोटी, तरी OBCमधून नियुक्ती?

IAS Officer Pooja Khedkar : खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे आणखी कारनामे समोर आलेत. ओबीसीमधून युपीएससीचा अर्ज दाखल करताना उत्पन्नासंबंधी दिलेल्या माहितीने पुजा खेडकरचा पाय आणखीच खोलात गेला आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSaam Digital
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे आणखीच कारनामे समोर आलेत. यामध्ये उत्पन्नाची माहिती लपवून ओबीसी आरक्षण लाटल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे आणखीच कारनामे समोर आलेत. त्यातच ओबीसीमधून युपीएससीचा अर्ज दाखल करताना उत्पन्नासंबंधी दिलेल्या माहितीने पुजा खेडकरचा पाय आणखीच गाळात गेलाय...त्यामुळेच पुजा खेडकरची नियुक्ती वादात सापडलीय.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएस म्हणून काम करत असताना पुजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही तिने हट्ट केला होता. त्याबरोबरच तिचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची अधिकाऱ्यांना दमबाजी यामुळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी पुजा खेडकरचा प्रोबशन काळ संपवून त्यांना दुसरीकडे बदली देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पुजा खेडकरचे कारनामे समोर यायला सुरुवात झालीय. एवढंच नाही तर पुजा खेडकरला 17 कोटींच्या मालमत्तेतून 42 लाखांचं उत्पन्न मिळतं. तर वडीलांच्या नावावर 40 कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून युपीएससीला अर्ज भरताना 8 लाख रुपयांची नॉन क्रिमीलेअर मर्यादा असतानाही कोट्यावधींची संपत्ती असलेल्या पुजा खेडकरने चुकीची माहिती देऊन आयएएसपदी नियुक्ती मिळाल्याचंही समोर आलंय.

IAS Pooja Khedkar
Vidhan Parishad Election : क्रॉस वोटिंगच्या धसक्याने विधानपरिषद निवडणुकीपूर्वी 'हॉटेल पॉलिटिक्स'; अंबानींचा विवाह, आमदारांना मिळेनात हॉटेल्स

खासगी गाडीवर दिवा लावण्यावरून सुरु झालेल्या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच सरकारची फसवणूक करून पुजा खेडकरने नियुक्ती मिळवल्याचंही समोर आलंय. त्यामुळे पुजा खेडकरला देशाच्या सर्वोच्च परीक्षेत हेराफेरी करण्यासाठी नेमकी कुणी मदत केली? पुजा खेडकरवर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

IAS Pooja Khedkar
Tanaji Sawant : तानाजी सावंतांची बनवाबनवी? HLL कंपनीला टेंडरविना 2000 कोटींची हमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com