Wreckage of a bike and car after a fatal head-on collision in Pune’s Bhor taluka, claiming the life of a 21-year-old युवक. Saam Tv
महाराष्ट्र

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार-दुचाकीची समोरासमोर धडक; 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

21 Year Old Youth Killed In Pune Bhor Accident: पुण्यातील भोर तालुक्यात भरधाव कार आणि दुचाकीच्या भीषण धडकेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात टेम्पो दरीत कोसळून 9 जण जखमी झाले.

Omkar Sonawane

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांच्या घटनांनी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. तर नागपूरमध्ये खराब रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर गावाच्या हद्दीत भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली.

या अपघातात दुचाकीवरील राजेश दशरथ राठोड (वय 21, रा. कोथरूड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. भोरकडे येताना तीव्र वळणावर अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोर - महाड मार्गावर टेम्पो दरीत कोसळला; 9 जण जखमी

दरम्यान आज पुण्यात दूसरा अपघात झाला असून भोर-महाड मार्गावरील शिरगाव परिसरात टेम्पो सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील 9 जण जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. किवत गावातील 15 ते 20 नागरिक नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी महाडकडे जात असताना हा अपघात झाला. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.

नागपूर भेगांनी भरलेला महामार्ग ठरतोय जीवघेणा

नागपूर जिल्ह्यातील काटोल-वरुड सिमेंट महामार्गावरील मोठ्या भेगांमुळे हा रस्ता अपघाताचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. गेल्या 10 दिवसांत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. 19 मार्च रोजी महेश धोटे यांचा अपघातात मृत्यू झाला, तर 27 मार्च रोजी प्रतीक पांडुरंग निकोसे (रा. जलालखेडा) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.

मागील एक वर्षात या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. राज्यातील या घटनांमुळे रस्त्यांची दुरवस्था, वेगमर्यादा आणि निष्काळजीपणा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिमुकल्याने खेळता खेळता गिळले लोहचुंबक, विनाशस्त्रक्रिया डॉक्टरांनी काढले बाहेर

Government Scheme: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना मिळतात ₹३०००; अटी काय? वाचा सविस्तर

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

SCROLL FOR NEXT