मोठी दुर्घटना! कराडमध्ये केमिकल बनवणाऱ्या कंपनीत स्फोट अन् अग्नितांडव, पाहा व्हिडिओ

karad chemical plant explosion : कराडमधील तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
karad midc Fire
karad midc FireSaam
Published On

संभाजी थोरात, कराड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Karad Tasawade MIDC chemical factory explosion fire details : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसी परिसरात एका केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार कंपनीत झालेल्या जोरदार स्फोटामुळे ही आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागण्याचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप ठोस कारण समोर आलेले नाही. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की धुराचे लोट लांबूनही स्पष्ट दिसत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र या दुर्घटनेत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

karad midc Fire
Kerosene: पेट्रोल- LPG नंतर आणखी एक दिलासादायक बातमी, रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com