Dhule News : ४४० किलो गांजा, किंमत दीड कोटी; ड्रग्ज माफियांचा पोलिसांनी केला पर्दाफाश, २४ वर्षांच्या तरुणाला बेड्या

Dhule Police Seize 570 Kg Ganja In Midnight Raid: धुळे शहरात पोलिसांनी मोठी ड्रग्जविरोधी कारवाई करत तब्बल 570 किलो गांजा जप्त केला असून 24 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
Police display seized 570 kg ganja worth ₹1.5 crore after a major drug bust in Dhule.
Police display seized 570 kg ganja worth ₹1.5 crore after a major drug bust in Dhule.Saam Tv
Published On

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे: अमली पदार्थ तस्करांच्या मुळावर घाव घालत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. शहराच्या पवन नगर आणि मोहाडी परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल 1 कोटी 42 लाख 65 हजार रुपयांचा 570 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वात मध्यरात्री केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, एका 24 वर्षीय तरुणाला बेड्या देखील ठोकण्यात आल्या आहेत.

Police display seized 570 kg ganja worth ₹1.5 crore after a major drug bust in Dhule.
साताऱ्यात मोठा राडा, भाजप कार्यकर्त्यांची झटापट; मंत्री शंभुराज देसाई जखमी|VIDEO

गेल्या काही दिवसांत राज्यात ड्रग्स माफियांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे. अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडाकेबाज पाऊल उचलत ड्रग माफियांचा फास आवळायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

Police display seized 570 kg ganja worth ₹1.5 crore after a major drug bust in Dhule.
Pune Crime: पुण्यातील मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना शहरात गांजाचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी करताच पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. मध्यरात्री पथकाने पवन नगर येथील संशयित आरोपी विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले याच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात लपवून ठेवलेला 440 किलो गांजा पाहून पोलीसही थक्क झाले.

Police display seized 570 kg ganja worth ₹1.5 crore after a major drug bust in Dhule.
MSRTC New Buses: CCTV कॅमेरा, GPS, पॅनिक बटण...;आधुनिक टेक्नोलॉजीसह एसटीच्या ताफ्यात ३००० नवीन बस

मात्र हे केवळ हिमनगाचे टोक होते संशयिताची सखोल चौकशी केली असता त्याने मोहाडी येथील आपल्या आजीच्या घरातही गांजा लपवल्याची कबुली दिली. तिथेही पोलिसांनी धाड टाकून 129 किलो गांजा जप्त केला. एकूण 570.61 किलो गांजा आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा माल कुठून आला आणि याचे जाळे कुठे पसरले आहे याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com