MSRTC New Buses: CCTV कॅमेरा, GPS, पॅनिक बटण...;आधुनिक टेक्नोलॉजीसह एसटीच्या ताफ्यात ३००० नवीन बस

MSRTC New Rajmata Jijau Electronic Buses : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात आता नवीन ३००० बसेस दाखल होणार आहे. राजमाता जिजाऊ बस या नवीन आत्याधुनिक टेक्नोलॉजीसह तयार करण्यात आल्या आहेत.
MSRTC New Buses
MSRTC New BusesSaamtv
Published On
Summary

परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन एसटी बस

राजमाता जिजाऊ एसटी बसचा समावेश होणार

३००० नवीन बस सेवेत दाखल होणार

परिवहन मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एसटी महामंडळात ३ हजार नवीन बसची भर पडली आहे. या आत्याधुनिक स्मार्ट बस असणार आहेत. राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नवीन बस जोडल्या जाणार आहे. या नवीन बसचे उद्घाटन उद्या २४ मार्च रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसेस दाखल होणार आहेत.

MSRTC New Buses
ST Mahamandal: लाडक्या बहिणींमुळे एसटी महामंडळाचे अच्छे दिन; सरकारकडून परिवहन विभागाला ५०८० कोटी रुपये

नवीन एसटी बसची वैशिष्टे काय?

  • नवीन राजमाता जिजाऊ एसटी बसमध्ये अनेक आत्याधुनिक बदल असणार आहे. बसमध्ये ३×२ आसन रचना असणार आहे. एकूण ५६ आसने असणार आहेत. सध्याच्या बसेसमध्ये ४० सीट असतात. या बसमध्ये १६ सीट जास्त आहेत.

  • या नवीन बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस, पॅनिक बटण, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक असणार आहे. यामुळे प्रवास खूप सुरक्षित होणार आहे.

  • राजमाता जिजाऊ एसटी बस दोन शहरांमध्ये चालवल्या जाणार आहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी शटल सेवेसाठी चालवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

  • या नवीन बसेस पहिल्यांदा नागपूरमध्ये दाखल होणार आहे. सुरुवातीला ५० बस चालवल्या जाणार आहेत. नागपूरमधून या बसेसची सुरुवात होणार आहे.

MSRTC New Buses
MSRTC: STच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे! नाशिक–जळगाव–धुळेलाही जाणार शिवनेरी; राज्यातील १० शहारांसाठी नवी बससेवा

राजमाता जिजाऊ हे नाव का दिलं?

या बसला राजमाता जिजाऊ नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कार म्हणजे राजमाता जिजाऊ. या मातृशक्तीचा गौरव या नावातून केला जाणार आहे. एसटी महामंडळाने याआधी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशी नावे दिली आहे. यात आता राजमाता जिजाऊ नावाची भर पडली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

MSRTC New Buses
MSRTC BUS: लालपरी बदलणार रुप; रस्त्यावर धावणार नव्या अवतारातील 22 हजार बस, कशा असतील नवीन ST बस जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com