hinganghat saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime News : पेट्रोलपंप लूट प्रकरणी हिंगणघाटात तिघांना अटक, एकाचा शाेध सुरु

या घटनेनंतर मालक आसिफ हुसैन यांच्यासह आकाश भेंडे यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha Crime News : हिंगणघाट येथे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. लुटणाऱ्या चारपैकी तीन आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चौथ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही पूर्ण घटना पेट्रोलपंपवरील सिसिटीव्हीत कैद झाली आहे. (Maharashtra News)

हिंगणघाटच्या जाम मार्ग येथील फिदा हुसैन भारत पेट्रोलपंपावर शनिवारी रात्री १०.३० च्या दरम्यान एका मोटारसायकलने चार इसम आले. यामध्ये भोजराज तुकाराम जंगले (३६) रा. भिमनगर वॉर्ड, मोहन भुसारी (२५), निखील भोकरे (१९) रा. चोखोबा वॉर्ड, तर आणखी एकाचा समावेश आहे.

त्यांनी कर्मचारी आकाश बबनराव भेंडे यास १०० रुपयांचे पेट्रोल गाडीत भरण्यास सांगितले. आकाशने पेट्रोल भरुन दिल्यावर मोटारसायकल चालकाने १०० रुपये दिले. त्यांना मोटारसायकल समोर घ्या, असे कर्मचारी आकाश भेंडे यांनी म्हणताच मोटारसायकलस्वार एका व्यक्तीने वादविवाद सुरू केला.

दुसऱ्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तिसऱ्या एका व्यक्तीने चाकूचा धाक दाखवित आकाश याचे खिश्यात हात घालून त्याच्या जवळचे ५२०० रुपये काढून घेतले. आरोपी थेट चाकू घेऊन पेट्रोलपंपाचे कॅबिनमध्ये पोहोचला. तेथे ड्रॉव्हरमध्ये पैशाचा शोध घेत ड्रॉव्हरचे लॉक तोडले. तेथे काहीच न मिळाल्यामुळे चारही आरोपींनी पळ काढला.

पेट्रोलपंप मालक आसिफ हुसैन फिदा हुसैन यांनी १० मिनिटाअगोदरच ड्रॉव्हरमध्ये असलेली रक्कम आपल्या बँगमध्ये घेतल्यामुळे ड्रॉव्हरमध्ये काहीच मिळाले नाही. या घटनेनंतर मालक आसिफ हुसैन यांच्यासह आकाश भेंडे यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT