Rs 10, 000 Coin : दहा हजार रुपयांचे नाणे पाहण्यासाठी नगरवासियांची उडाली झुंबड

लक्ष्मीच्या पावलाने आल्याची भावना मनात ठेवून आम्ही नाणे स्विकारल्याची माहिती हाॅटेल मालकाने साम टीव्हीशी बाेलताना दिली.
ten thousand rupees coin
ten thousand rupees coinsaam tv

- सुशील थोरात

Nagar News : नगर शहरातील नगर पाथर्डी रस्त्यावरील एका हॉटेल मालकास एका ग्राहकाने दहा हजार रुपयांचे नाणे दिले. हे नाणे पाहताच हाॅटेल मालक थाेडे चक्रावले. त्यांनी हे नाणे निरखून पाहिल्यानंतर त्यांनी ते स्विकारले. या नाण्याची चर्चा नगर जिल्ह्यात पसरल्यानंतर हे नाणे पाहण्यासाठी हाॅटेलमध्ये गर्दी हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

ten thousand rupees coin
Maratha Or Kunbi : मराठा की कुणबी? नितेश राणेंनी दिले मनोज जरांगेंना चर्चेचे निमंत्रण

या नाण्याबाबत सुधीर वायकर म्हणाले चांदीच्या रंगाप्रमाणे चकाकणारे हे नाणे आहे. या नाण्याच्या एका बाजूला दहा हजार रुपयांचा आकडा आहे. दुसऱ्या बाजूला रवींद्रनाथ टागोर यांचे चित्र आहे. रवींद्रनाथ टागोर यांची 150 वी जन्म जयंती असे हिंदी आणि इंग्रजीत छापण्यात आले आहे. सन 1861 ते 2011 असा कालावधी या नाण्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्या छायाचित्राखाली छापण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ten thousand rupees coin
PM To Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीतील विकासकामांचे लोकार्पण होणार : खासदार सुजय विखे-पाटील

हे नाणे खरे की खाेटे यामध्ये आम्ही पडलाे नाही. सणासुदीच्या काळात आपल्या घरी लक्ष्मी आली आहे असे मानून आम्ही हे नाणे स्विकारले आहे. हे नाणे पाण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेत आहे. आम्हांलाही या नाण्याचं कुतूहल वाटल्याने ते आम्ही स्विकारल्याचे सुधीर वायकर यांनी नमूद केले.

नाण्याबाबत अद्याप आरबीआयची घाेषणा नाही

दरम्यान साम टीव्हीने सातारा शहरातील दाेन- तीन बॅंक व्यवस्थापकांशी दहा हजार रुपयांचे नाणे चलनात आले आहे का ? यावर चर्चा केली असता बॅंकांच्या व्यवस्थापकांनी सध्या तरी आमच्याकडे अशा स्वरुपाचे काेणतेही नाणे आलेले नाही असे स्पष्ट केले. आरबीआयने (RBI) दहा हजार रुपयांच्या नाण्याबाबत अद्याप घाेषणा केलेली नाही असे सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

ten thousand rupees coin
FDA ची तुळजापुरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई, 9 व्यावसायिकांना शटर डाऊनचा आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com