- सचिन बनसाेडे
Shirdi News : पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi) यांच्या हस्ते शिर्डीतील विविध विकास कामांचे लोकार्पण येत्या २६ ऑक्टोबरला शिर्डी येथे हाेईल. या कार्यक्रमांची प्राथमिक रुपरेषा ठरल्याची माहिती खासदार सूजय विखे-पाटील (mp sujay vikhe patil) यांनी आज (मंगळवार) माध्यमांशी बाेलताना दिली. (Maharashtra News)
खासदार सुजय विखे-पटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या दौ-या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. येत्या २६ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता पंतप्रधान माेदी हे शिर्डीत येतील. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते शिर्डीतील विविध विकासकामांचे उदघाटन हाेईल. शिर्डी येथे बांधण्यात आलेल्या अद्ययावत दर्शन काॅम्लेक्स, शैक्षणिक संकुल आणि निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या लोकार्पणासह शिर्डी विमानतळाच्या बिल्डींगचे भुमीपूजन हाेईल असेही खासदार विखे-पाटील यांनी नमूद केले. दरम्यान ही प्राथमिक रुपरेषा असल्याचे खासदार विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.