Parbhani Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Accident: मॉर्निंग वॉकसाठी गेल्या, पण परत आल्याच नाहीत; कारच्या धडकेत २ जिवलग मैत्रिणींचा मृत्यू

Parbhani Accident: परभणीमध्ये भरधाव कारच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या महिला मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. अपघातानंतर कार चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Priya More

Summary -

  • परभणी दैठणा येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना कारने धडक दिली.

  • या अपघातात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला.

  • मृत महिलांमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षाची पत्नीही होती.

परभणीमध्ये भीषण कार अपघातामध्ये दोन महिलांचा जागीच मृ्त्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परभणीतील दैठणा येथे ही अपघाताची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता दोन मैत्रिणींना कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळावर तणावाचे वातावरण होते. दोन्ही महिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी तालुक्यातील दैठणा येथे हा अपघात झाला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या २ महिलांचा कारने धडक दिली. परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणापासून २ किमी अंतरावर माळ सोना फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव कच्छवे यांच्या पत्नी पुष्पा उत्तम कछवे आणि अजनाबई सुरेशराव शिसोदे या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर दोघींचे मृतदेह कुटुंबीयांकडे दिले जाणार आहे. या अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत तपास करत आहेत.

दरम्यान, गडचिरोलीमध्ये देखील अशीच अपघाताची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या ६ तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सहाही जण मित्र होते. हा अपघात गडचिरोली-नागपूर महामार्गावरील काटली येथे झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

SCROLL FOR NEXT