Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार; मजुरांनी भरलेल्या पिकअपचा ताबा सुटला अन्...

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आडुळ खुर्द शिवारात मोसंबी तोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात झाला. वाहन झाडावर आदळल्याने २५ मजूर जखमी झाले असून, ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार; मजुरांनी भरलेल्या पिकअपचा ताबा सुटला अन्...
Sambhajinagar Accident Saam Tv
Published On
Summary
  • आडुळ खुर्द येथे मोसंबी तोड मजुरांच्या पिकअपला अपघात

  • वाहन झाडावर आदळल्याने २५ मजूर जखमी, ८ गंभीर

  • स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले

  • शासनाने वैद्यकीय खर्च उचलावा आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडुळ खुर्द शिवारात मोसंबी तोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनाचा अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळले. या भीषण अपघातात वाहन चालकासह एकूण २५ मजूर जखमी झाले असून त्यातील आठ जण गंभीर आहेत.

बुधवारी सकाळी सुमारास हा अपघात झाला. पिकअप (MH 20 EL 3384) वाहन अब्दुल्लापूर तांडा, ता. पैठण येथून २७ मोसंबी तोड मजुरांना घेऊन आडुळकडे निघाले होते. आडुळ खुर्द शिवारातील एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या खाली घसरले आणि दोन लिंबाच्या झाडांवर आदळले.

Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार; मजुरांनी भरलेल्या पिकअपचा ताबा सुटला अन्...
Sambhaji Nagar: शिक्षकाविना शाळा! सरकारी शाळेत फक्त दोनच शिक्षक; विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता

जखमी झालेल्यांमध्ये अभय तुळशीराम चव्हाण (१८), सुमन कल्याण राठोड (२२), अमर तुळशीराम चव्हाण (१९), सुनिता अनिल चव्हाण (२७), छबाबाई ज्ञानू चव्हाण (५०), आरती अर्जुन चव्हाण (१५), पारुबाई ज्ञानेश्वर राठोड (२७), रेखाबाई बाबासाहेब चव्हाण (२५), उषा सुनील राठोड (३२), अविनाश प्रकाश चव्हाण (१६), द्रौपदाबाई रामनाथ चव्हाण (५०), सुरेश रणजीत राठोड (३०), सुनिता विनायक राठोड (३०), उषा लहू राठोड (४०) यांच्यासह अन्य मजुरांचा समावेश आहे.

Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार; मजुरांनी भरलेल्या पिकअपचा ताबा सुटला अन्...
Sambhajinagar : मोबाईलसाठी हट्ट; आईने नकार दिल्याने मुलाने घेतली डोंगरावरून उडी

अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, पोलिस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्तांची पाहणी केली आणि रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. जखमींना तातडीने आडुळ येथील पवार हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल आणि साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चिकलठाणा येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार; मजुरांनी भरलेल्या पिकअपचा ताबा सुटला अन्...
Sambhaji Nagar: आधी ३० मिनिटं केली रेकी, अवघ्या 15 सेकंदांत तरुणाला कारमध्ये कोंबले; संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार

घटनेची माहिती मिळताच आडुळ, गेवराई आणि अब्दुल्लापूर तांड्यातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना रुग्णालयात पोहोचवले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांवर संकट ओढवल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, तसेच आर्थिक मदतही द्यावी, अशी मागणी केली आहे.

Q

हा अपघात कुठे घडला?

A

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडुळ खुर्द शिवारात.

Q

पिकअपमध्ये कोण होते?

A

अब्दुल्लापूर तांडा येथील मोसंबी तोडणारे २७ मजूर.

Q

किती लोक जखमी झाले आहेत?

A

एकूण २५ मजूर जखमी झाले असून त्यातील ८ जण गंभीर आहेत.

Q

जखमींना कुठे उपचारासाठी नेण्यात आले?

A

आडुळ येथील विविध खासगी रुग्णालयात, आणि गंभीर जखमींना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com