Sambhajinagar : मोबाईलसाठी हट्ट; आईने नकार दिल्याने मुलाने घेतली डोंगरावरून उडी

Sambhajinagar News : आई- वडिलांकडून हट्ट पुरविण्यास नकार दिल्यानंतर मुलं टोकाची भूमिका घेत असल्याच्या घटना घडल्या असून केवळ मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याच्या कारणातून १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : आई- वडिलांकडे मुलं वस्तू घेण्यासाठी हट्ट करत असतात. मुलांचे हट्ट देखील पुरविले जातात. मात्र एखादा हट्ट पुरविण्यास नकार दिल्यास मुलं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशीच घटना संभाजीनगर जिल्ह्यात समोर आली असून मोबाईल घेऊन न दिल्याच्या कारणावरून रागात मुलाने डोंगरावर जाऊन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातल्या खवल्या डोंगरावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. अथर्व गोपाल तायडे (वय १६) असं त्या तरुणाचे नाव आहे. अथर्व तायडे हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवाशी होता. अथर्व हा वाळूज येथे पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलीस भरतीत जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यासाठी त्याचे घरच्यांचा पूर्ण पाठींबा होता. 

Sambhajinagar News
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गांवर पाळावी लागणार वेग मर्यादा; एक किमी अंतरावर बसणार स्पीड सेन्सर कॅमेरा, उल्लंघन केल्यास दंड

मोबाईल घेऊन न दिल्याने झाला नाराज 

दरम्यान काही दिवसांपासून अथर्वने त्याच्या आईकडे मोबाईल घेण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, आईने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला. यातून नाराज झालेल्या अथर्वने रविवारच्या दिवशी जवळच असलेल्या खवल्या डोंगर परिसरात गेला. यानंतर त्याने डोंगरावरून खाली उडी मारली. जखमी अथर्वला जवळच असलेल्या काही लोकांनी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर एकच आक्रोश केला. 

Sambhajinagar News
Jayadwadi Dam : जायकवाडीचे बॅकवॉटर शेतात; पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचे पाण्यात उतरत आंदोलन

नियंत्रण सुटल्याने कार चालकाने २५ जणांना मारला कट 

रामटेक तालुक्यातील नगरधन येथे कारवरील नियंत्रण सुटून कारचालकाने २५ ते ३० लोकांना कट मारली. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत कार चालवत होता. त्यामुळे त्याने २५ ते ३० लोकांना कट मारल्याचे सांगितले जात आहे. संतप्त गावकऱ्यांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला. हर्षपाल महादेव वाघमारे असे नाव असून तो भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. चार दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचं सांगितलं जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com