Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Corridor: पंढरपूरचं रुपडं बदलणार! उज्जैन-काशीच्या धर्तीवर तयार होणार कॉरिडॉर, कसा आहे प्लान?

Pandharpur Vitthal- Rukmini Mandir: पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसराचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार आहे. पंढरपुरमध्ये कॉरिडॉर तयार केले जाणार आहे. उज्जैन-काशीच्या धर्तीवर हे कॉरिडॉर तयार होणार आहे.

Priya More

भरत नागणे, पंढरपूर

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील बहुचर्चित असलेल्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अलीकडेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक घेतली होती. त्याबैठकीमध्ये प्रस्तावित विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी येत्या तीन महिन्यात कॉरिडॉरच्या कामाला सुरवात होईल असे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासन गतीने कामाला लागले आहे.

मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यातील माहिती आता समोर आली आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील चौफळा ते महाद्वार या दरम्यान १०० मीटर अंतरापर्यंतच्या मालमत्ता बाधित होणार आहेत. प्रस्तावित विकास आराखडा बाहेर आल्याने कामाला लवकरच सुरवात होईल हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. आषाढी यात्रेच्या वेळी कॉरिडॉरच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु असल्याचीही माहिती आहे.

पंढरपुरातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता शासनाने विठ्ठल मंदिर परिसरात उज्जैन आणि काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांना याच भागात नवीन दुकान गाळे बांधून देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. शिवाय बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांना इतर प्रकल्पापेक्षा अधिकची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. येत्या काही काळात विकास आराखड्याचे काम सुरु झाल्यास पंढरपूर शहराचे रुपडे बदल्याचे पाहायला मिळणार आहे.

असा आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा -

विठ्ठल मंदिर कॉरिडॉर, चंद्रभागा स्नान व्यवस्था, रस्ते विकास, वाहन तळ विकास, पालखी तळ विकास, वारकरी विश्रांती कक्ष

मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर -

- चौफळा ते पश्चिमद्वार घाट - १०० मीटर

- पश्चिमद्वार ते नामदेव पायरी - ६० ते १०० मीटर

- संत नामदेव पायरी ते महाव्दार घाट - १०० मीटर

- चौफळा ते महाद्वार घाटपर्यंत - ५०० मीटर लांबी

६० मीटरपर्यंत बाधित होणार मालमत्ता -

- निवासी मलमत्ता- १६३ (२८.६२ कोटी मूल्य)

- अनिवासी मालमत्ता ३८४ (७०.५० कोटी)

८० मीटरपर्यंत बाधित होणाऱ्या मालमत्ता -

निवासी मालमत्ता - २९० (५२ कोटी ३४ लाख)

अनिवासी मालमत्ता - (५३ कोटी)

१०० मीटरपर्यंत बाधित होणाऱ्या मालमत्ता -

निवासी मालमत्ता - ४२४ (८३ कोटी ६४ लाख)

अनिवासी मालमत्ता - ५१० (७२ कोटी ५१ लाख)

चंद्रभागा स्नान व्यवस्था -

चंद्रभागेतील पात्रात कामयस्वरुपी स्वच्छ आणि शुध्द पाणी राहावे यासाठी कृत्रिम कालवे तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये जूना दगडी पूलपासून कृत्रिम कालवा बांधण्याचेही विकास आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT