Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv

Pandharpur : चैत्री यात्रेसाठी पंढरपुरात गर्दी; भाविकांसाठी ६ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती

Pandharpur News : पंढरपूरमध्ये चैत्री यात्रोत्सवानिमित्ताने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर प्रसाद म्हणून लाडू खरेदी करतो
Published on

पंढरपूर : पंढरपूरमध्ये चैत्री यात्रेची तयारी सुरु असून यात्रेनिमित्ताने भाविकांची पंढरपूरमध्ये गर्दी झाली आहे. तर मंदिर समितीच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी सहा लाख बुंदी लाडू तयार करण्यात आले आहेत. उद्या चैत्री यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून बुंदी लाडू अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

पंढरपूरमध्ये चैत्री यात्रोत्सव साजरा करण्यात येत असतो. या यात्रोत्सवानिमित्ताने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने ६ लक्ष बुंदी लाडू व ६० हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे. 

Pandharpur News
Muktainagar Accident : भरधाव मालवाहू गाडीचे टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू, पाचजण जखमी

अल्पदरात लाडूचा प्रसाद 

यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट २० रुपये प्रमाणे व २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट १० रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

Pandharpur News
Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारत फासले शेण; ठाकरे गटाकडून जालना, बीडमध्ये आंदोलन

तीन स्टॉलवर रात्री १२ पर्यंत प्रसाद वाटप 
बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्था पासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत आहे. तयार करण्यात आलेल्या लाडूच्या प्रसादासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com