Pandharpur Corridor : पंढरपूर कॉरिडॉरचे काम तीन महिन्यात सुरु होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Pandharpur Corridor : उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर असलेल्या पंढरपूर कॉरिडॉर या प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
pandharpur corridor devendra fadnavis
pandharpur corridor devendra fadnavissaa, tv
Published On

भरत नगाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला येत्या तीन महिन्यांमध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत बैठकीमध्ये या प्रकल्पाचा आराखडा पाहिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आराखडा पाहिला. फडणवीस यांनी प्रकल्पाच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवला.

pandharpur corridor devendra fadnavis
Sambhajinagar News : कुत्र्यांना घाबरुन पळाला; तरुण खोल विहिरीत पडला, २ दिवस दोरीला पकडून राहिला अन् नंतर...

आत्तापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना जितका मोबादला दिला नाही, त्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूरमधील कॉरिडॉर पाधितांना देण्यात येईल असे देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता, काही घरे ताब्यात घ्यावी लागणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

pandharpur corridor devendra fadnavis
Crime News : आयुष्यभर सोबत राहायच्या आणाभाका, कुटुंबीयांचा विरोध झुगारून लग्नगाठ बांधली; अवघ्या २ वर्षात संसाराची राखरांगोळी

पंढरपूर कॉरिडॉरसाठी ज्यांची जमीन जाईल, त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल. त्यांना चांगला मोबादला दिला जाईल. तसेच आषाढी वारीच्या पूर्वी या प्रकल्पातील काही कामे सुरु होतील. तर आषाढीच्या नंतर काही कामांना सुरुवात होईल असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांसमोर केले आहे.

pandharpur corridor devendra fadnavis
Mumbai : ईददरम्यान डोंगरीत हिंदू-मुस्लिम दंगल होणार, त्या पोस्टमुळे खळबळ, मुंबई पोलीस सतर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com