
Mumbai Latest News Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तणावाचे वातावरण आहे. त्यात सोशल मीडियामुळे भर पडत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद उफळला होता, त्यात नागपूरमध्ये दंगल घडली अन् कायदा सुव्यस्था पुन्हा चव्हाट्यावर आली. आता सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. ईदवेळी मुंबईतील डोंगरीमध्ये दंगल होण्याची शक्यता आहे, सावध राहा.. अशी पोस्ट एकाने एक्सवर केली आहे. या पोस्टनंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहे.
औरंगजेबाच्या कबरीमुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. त्यात मुंबईत हिंदू-मुस्लिम दंगल होऊ शकते, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवी मुंबई पोलिसाला या पोस्टमध्ये टॅग करण्यात आले आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून उपाययोजना केली जात आहे. ईदच्या दिवशी मुंबईमध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट आणि दंगल होऊ शकतो, पोलिसांनी सतर्क राहावे, अशी पोस्ट द शास्वत शुक्ला ट्रूथ स्पीक्स या एक्स हँडलवरून करण्यात आलेली आहे.
रमजान ईददरम्यान ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी मुंबईतील डोंगरी परिसरात हिंदू-मुस्लिम दंगल, जाळपोळ होऊ शकतो. त्याशिवाय या ठिकाणी बॉम्बस्फोट होऊ शकतात. मुंबई पोलिसांनी सतर्क राहावं, असा इशारा एका युजर्सने सोशल मीडियावर पोस्ट करत दिला आहे. सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत ईदच्या दिवशी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.
एक्सच्या पोस्टमध्ये नेमकं काय काय ?
३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यान, डोंगरी परिसरात बेकायदेशीररीत्या राहणारे रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर हिंदू-मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात, असा दावा एक्सवरील द शास्वत शुक्ला ट्रूथ स्पीक्सने या पोस्टमधून केला आहे. या पोस्टला मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आले आहे.
एक्सवरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढला आहे. दंगल होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणा मुंबईतील प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून असल्याचेही समजतेय. मुंबई पोलिसांना अद्याप कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसून आलेल्या नाहीत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे पोलिसांनी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.