Sambhajinagar News : कुत्र्यांना घाबरुन पळाला; तरुण खोल विहिरीत पडला, २ दिवस दोरीला पकडून राहिला अन् नंतर...

Sambhajinagar Incident : नातेवाईकाच्या गावी गेलेला एक तरुण कुत्र्यांपासून बचाव करताना पळत असताना विहिरीमध्ये पडला. दोन दिवस तो विहिरीत दोरीच्या मदतीने लटकून होता. या तरुणाला विहिरीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
Sambhajinagar Incident
Sambhajinagar IncidentSaam Tv
Published On

माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : नातलगाला भेटण्यासाठी गावी आलेल्या एका तीस वर्षीय तरुणावर चांगलाच प्रसंग ओढावला. या तरुणाच्या मागे गावतले कुत्रे लागले. पळ काढल्यानंतर हा तरुण विहिरीमध्ये जाऊन पडला. विहिरीमध्ये दोन दिवस आणि दोन रात्री एका दोरीला लटकून राहिला. तिसऱ्या दिवशी त्याचा आवाज त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर गावात नातेवाईकांना भेटण्यासाठी एक तीस वर्षीय तरुण पोहोचला होता. गावात प्रवेश करताच त्याच्यामागे मोकाट कुत्रे लागले. कुत्र्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तरुणाने पळ काढला खरा पण तो चुकून एका खोल भूमिगत विहिरीमध्ये जाऊन पडला.

Sambhajinagar Incident
Crime News : शौचालयासाठी घराबाहेर पडली अन् घात झाला, १६ वर्षीय मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून धमकावलं

पीडित तरुण विहिरीला लागून असलेल्या दोरीला धरुन राहिला. विहिरीमध्ये लटकत त्याने दोन दिवस आणि दोन रात्री उपाशी राहून काढल्या. या कालावधीमध्ये तो मदतीसाठी अनेकदा आरडाओरड करत होता पण विहीर निर्मनुष्य ठिकाणी असल्याने त्याच्या मदतीला कुणी आले नाही. याशिवाय विहीर खूप खोल असल्याने त्याचा आवाज बाहेर पोहोचला नाही.

Sambhajinagar Incident
Crime News : आयुष्यभर सोबत राहायच्या आणाभाका, कुटुंबीयांचा विरोध झुगारून लग्नगाठ बांधली; अवघ्या २ वर्षात संसाराची राखरांगोळी

विहिरीच्या दोरीला लटकून तरुणाने दोन दिवस कसेबसे काढले. शेवटी तिसऱ्या दिवशी मोहोळ शोधण्यासाठी काहीजण त्या निर्मनुष्य ठिकाणी आले. त्यांना तरुणाचा आवाज आला. पुढे गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. संदीप घटकवडे असे विहिरीमध्ये पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

Sambhajinagar Incident
Pune Crime News : घरात घुसला, फोन हिसकावला अन्...; पुण्यात गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com