

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची संधी
जेआरफएफ प्रोग्रामअंतर्गत मिळणार
स्टायपेंड मिळणार ३७०००
नोकरीच्या शोधात असणाऱ्या करण्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भाभा ऑटोमिल रिसर्च सेंटरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. बीएआरसीने फेलोशिप जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.barc.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. जेआरफ २०२६ प्रोग्रामअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.
बीएआरसी फेलोशिपमध्ये १०५ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या उमेदवारांना महिन्याला स्टायपेंडदेखील दिली जाणार आहे.
भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिपअंतर्गत ही भरती होणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया १० मार्चपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात.
भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधील या फेलोशिपसाठी जून-जुलैमध्ये इंटरव्ह्यू होऊ शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २८ वर्ष असावे. या फेलोशिपसाठी निवड झाल्यावर महिन्याला ३७,००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. जर तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला सिनियर रिसर्च फेलोशिप केले जाईल. यासाठी ४२००० रुपये स्टायपेंड मिळेल.
ज्युनिअर फेलोशिप पदासाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमएससी/ इंटीग्रेटेड एमएससी/ बीएस-एमएस / बीएस डिग्री असावी. याचसोबत उमेदवारांकडे UGC-CSIR-NET फेलोशिप, JEST स्कोर, ICMR-JRF टेस्ट, ICAR-JRF टेस्ट स्कोरकार्ड असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला barcocesexam.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनवर जाऊन ज्युनिअर रिसर्च फेलोशिपवर क्लिक करायचे आहे.
यानंतर संपूर्ण अर्जप्रक्रिया पूर्ण करा. रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करा.
यानंतर तुमचे नाव, पत्ता, वय, शैक्षणिक कागदपत्र अपलोड करा.
फोटो आणि सही अपलोड करुन प्रोसेस पूर्ण करा. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.