सावधान! बुलढाण्यात २४ तासांत ७ महिला बेपत्ता; अडीच महिन्यातील आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Buldhana missing persons report : बुलढाणा जिल्ह्यात महिलां व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत ७ मुली बेपत्ता झाल्या असून १ जानेवारी ते १० मार्च दरम्यान एकूण २८९ महिला व मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
girls, women went missing
girls, women went missingSaam
Published On

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

7 girls missing in 24 hours in Buldhana Maharashtra case : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याचे दिसतेय. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातून महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये जास्त वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आलेय. मागील २४ तासांत बुलढाण्यातून ६ मुली आणि एक विवाहिता बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत बुलढाण्यातून एकूण २८९ जण (289 women reported missing in Buldhana district) बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त महिला व मुलींचा समावेश असल्याने परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुली, तरुणी तसेच विवाहित महिलाही अचानक बेपत्ता होत असल्याने जिल्ह्यातील अनेक कुटुंबे सध्या चिंतेत आहेत.

girls, women went missing
LPG गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबणार; फक्त एक कॉल करा आणि पोलिसांना कळवा, आयुक्तांचे कडक निर्देश

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणांमध्ये मुली घरातून निघून गेल्याचे समोर येते, तर काही प्रकरणांमध्ये बेपत्ता झाल्यानंतर त्या कुठे गेल्या, त्यांचे पुढे काय झाले याची कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक पालकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागासह शहरांमधूनही मुली व महिलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात आहेत. मात्र, बेपत्ता झालेल्या मुली किंवा महिलांचा शोध लागण्याचे प्रमाण कमी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे या घटनांमागे नेमके काय कारण आहे, याबाबतही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

girls, women went missing
SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

दरम्यान, या वाढत्या घटनांबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता अधिकच वाढत आहे. जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून बेपत्ता झालेल्या मुली व महिलांचा तात्काळ शोध घेण्याची मागणी केली आहे. तसेच पालकांनीही आपल्या मुलींवर लक्ष ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या मात्र बुलढाणा जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

girls, women went missing
कोरोना लसीमुळे साईड इफेक्ट्स झाला? सरकारला द्यावा लागणार मोबदला; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com