पालघरमध्ये तरुणाची आत्महत्या
मोरवणे धरणात उडी मारून आयुष्य संपवलं
आई रागावल्याचा राग मनात ठेवत उचललं टोकाचे पाऊल
सफाळे पोलिस तपास करत आहेत
पालघरमध्ये आई रागावल्याच्या रागातून तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाने मोरवणे धरणात उडी घेत आयुष्य संपवलं. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. सपाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यज्ञेश प्रमोद सांबरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो नारोडा येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. गुरुवारी सकाळी मोरवणे धरणात त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास सफाळे पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सफाळे पोलिस ठाण्यात हद्दीतील मोरवणे धरणामध्ये एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले होते. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आणि तपास सुरू केला. तर हा मृतदेह यज्ञेश प्रमोद सांबरे या तरुणाचा असल्याचे समजले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
आई रागावल्याने मनाला लागल्याने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती तपासात समोर आली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सफाई पोलिस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, घरातील किरकोळ वादाने आई रागवल्याने यज्ञेश मानसिक तणावाखाली होता.
रागाच्या भरामध्ये यज्ञेश घराबाहेर पडला आणि मोरवणे धरणाच्या दिशेने गेला. धरणामध्ये उडी मारत त्यांने आयुष्य संवपलं. मुलाने आत्महत्या केल्याचे कळताच त्याच्या आईला मोठा धक्का बसला. मात्र नेमकं यज्ञेशने आत्महत्या कोणत्या वेगळ्या कारणाने तर केली नाही ना याचा तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.