Shreya Maskar
वसई किल्ल्याला बेसीनचा किल्ला असेही म्हणतात. जो पालघर जिल्ह्यातील वसई येथे आहे. मुंबईपासून सुमारे ५५ किमी अंतरावर हा किल्ला स्थित आहे. वसई किल्ला १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला.
वसई किल्ला वसई-विरारजवळ आहे. तुम्ही 'वसई रोड' रेल्वे स्टेशनला उतरा आणि तेथून पुढे रिक्षाने वसई किल्ल्यापर्यंत पोहचा.
वसईला गेल्यावर भुईगाव बीच, जीवदानी देवी मंदिर , तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यला तुम्ही भेट देऊ शकता. उन्हाळ्यात येथे तुम्हाला थंड वातावरण अनुभवता येईल.
वसई किल्ल्याला एकेकाळी 'उत्तराचे न्यायालय' म्हणून ओळखले जात असे. हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे नक्कीच ट्रिप प्लान करा.
पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिश राजवटीचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यात ऐतिहासिक चर्च, बुरुज, आणि खाडीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
वसईचा ऐतिहासिक किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने आणि खाडीच्या पाण्याने वेढलेला होता, ज्यामुळे तो एक अभेद्य सागरी किल्ला बनला होता.
१७३९ रोजी पेशवा बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने पोर्तुगीजांचा पराभव करून ऐतिहासिक वसईचा किल्ला जिंकला.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.