Goa Tourism : गोव्यातील 'ही' ठिकाणे जणू काश्मीरच, भर उन्हाळ्यातही भरेल हुडहुडी

Shreya Maskar

उन्हाळी सहल

उन्हाळ्यात तुम्ही गोव्याला ट्रिप प्लान करा. येथे तुम्हाला थंड वातावरण अनुभवता येईल. तसेच फॅमिली ट्रिप असो वा मित्रमंडळींसोबत फिरणे गोवा, बेस्ट लोकेशन आहे. येथे बीचवर तुम्ही पार्टीचा आनंद घ्या.

family picnic | canva

बोंडला वन्यजीव अभयारण्य

गोव्यात गेल्यावर बोंडला वन्यजीव अभयारण्य नक्की पाहा. लहान प्राणी संग्रहालय, वनस्पती उद्यान आणि हिरवीगार कुरणे येथे पाहायला मिळतात. लहान मुलांना जवळून पक्षी-प्राणी पाहायला मिळतील.

Bondla Wildlife Sanctuary | google

मायेम तलाव

उत्तर गोवा येथे मायेम तलाव आहे. येथे बोटींगचा आनंद घेता येतो. तसेच हिरवीगार बाग आणि गोड्या पाण्याच्या तलाव येथे आहे. निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.

Mayem Lake | google

गोवा

दक्षिण गोवा येथे साळावली धरण धरण आहे. हे त्याच्या विस्तीर्ण वनस्पती उद्यानासाठी आणि जलाशयाच्या नयनरम्य दृश्यासाठी ओळखले जाते.साळावली धरण हे गोव्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असून ते दक्षिण गोव्यासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे.

goa | pinterest

काबो दे रामा बीच

काबो दे रामा हे दक्षिण गोव्यामध्ये वसलेले एक शांत, सुंदर आणि तुलनेने कमी गर्दीचे लपलेले रत्न आहे. या समुद्रकिनाऱ्यावर सोनेरी वाळू, नारळाची झाडे आणि खडकाळ किनारा आहे. हे ठिकाण येथील मनमोहक सूर्यास्त, शांत परिसर, पोहण्याची सोय आणि सहलीच्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे.

Cabo de Rama Beach | google

दिवर बेट

गोव्यातील मांडवी नदीच्या मध्यभागी वसलेले दिवर बेट, त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, शांत वातावरणासाठी, जुन्या पोर्तुगीज घरांसाठी आणि हिरव्यागार शेतांसाठी प्रसिद्ध आहे.

Divar Island | google

गोव्याजवळील पर्यटन स्थळे

गोव्या जवळ निसर्ग सौंदर्याचा खजिना आहे. येथे दांडेली, गणपतीपुळे, तारकर्ली बीच, सावंतवाडी आणि गोकर्ण बीच ही सुंदर ठिकाणे आहेत.

Tourist Destinations Near Goa | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | pinterest

NEXT : शाळेला सुट्टी लागली, कोकणात फिरायला जा; पाहा 'सावंतवाडी'तील ५ स्वर्गाहून सुंदर ठिकाणे

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा...