Sindhudurg Tourism : शाळेला सुट्टी लागली, कोकणात फिरायला जा; पाहा 'सावंतवाडी'तील ५ स्वर्गाहून सुंदर ठिकाणे

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

सावंतवाडी हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. सावंतवाडी हे कोकणची शान आहे.

Sindhudurg | google

सावंतवाडी

सावंतवाडी पारंपरिक हाताने रंगवलेल्या लाकडी खेळण्यांसाठी आणि हस्तकलांसाठी जगप्रसिद्ध आहे. अनेकदा 'कलाकारांची भूमी' म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.

Sawantwadi | google

पर्यटन स्थळे

सावंतवाडी येथे मोती तलाव, सावंतवाडी राजवाडा, नरेंद्र उद्यान, शिव उद्यान आणि आंबोली घाटातील धबधबे ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.

Tourist Attractions | google

मोती तलाव

मोती तलाव सावंतवाडी शहराच्या मध्यभागी राजवाड्याच्या समोर वसलेले आहे. डोंगरांनी वेढलेला या कृत्रिम तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Moti Talao | google

सावंतवाडी राजवाडा

सावंतवाडी राजवाडा हा 'रॉयल पॅलेस' म्हणून ओळखला जातो.येथे पारंपारिक लाकडी हस्तकला, जगप्रसिद्ध 'गंजिफा' कला आणि आकर्षक लाखकामाच्या वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळते.

Sawantwadi Palace | google

नरेंद्र उद्यान

सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगर उद्यान हे माठेवाडा भागात, टेकडीवर वसलेले आहे. येथे घनदाट झाडी, फिरण्यासाठी रस्ते आणि शहराचे विहंगम दृश्य दिसते. पावसाळ्यात येथे धबधबे दिसतात.

Narendra Garden | google

आंबोली

सावंतवाडीपासून सुमारे ३०-३५ किमी अंतरावर असलेला आंबोली घाटनिसर्गप्रेमींसाठी पर्यटन स्थळ आहे. इथे अनेक छोटे-मोठे धबधबे आहेत, ज्यामध्ये मुख्य आंबोली धबधबा, नांगरतास धबधबा यांचा समावेश आहे.

Amboli | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

NEXT : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Thane Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...