Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Shreya Maskar

येऊर हिल्स

येऊर हिल्स 'ठाण्याचे स्वर्ग' म्हणून ओळखले जाणारे हिल स्टेशन आहे. हे ठिकाण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे, जे शहराच्या जवळ ट्रेकिंग आणि हिरवळीचा अनुभव देते.

Yeoor Hills | google

सूर्यमाल हिल स्टेशन

सूर्यमाल हिल स्टेशन हे समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर वसलेले आहे. येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.

Suryamal Hill Station | google

ट्रेकिंग स्पॉट

'ठाण्याचे महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाणारे येऊर हिल्स हिरवीगार जंगलांनी वेढलेले आहे. येथे पक्षी निरीक्षणाचा सुंदर अनुभव घेता येतो.

Trekking | google

सायकलिंग

वीकेंडला पिकनिक, सायकलिंगसाठी ही दोन्ही ठिकाणे बेस्ट आहेत. स्थानिक लोक येऊर हिल्सला जॉगिंग करण्यासाठी ही येतात.

Cycling | google

सूर्यमाल ‌

ठाणे जिल्ह्यातील खोडाला जवळ वसलेले 'सूर्यमाल' हे एक सुप्रसिद्ध गिरीशिखर पर्यटन स्थळ आहे. या प्रदेशातील सर्वात उंच शिखर (सुमारे १,८०० फूट) म्हणून सूर्यमाल हे ठिकाण ओळखले जाते.

Suryamal | google

निसर्ग सौंदर्य

सूर्यमाल आणि येऊर हिल्स वरून घनदाट अरण्यांचे आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. ज्यामुळे हे ठिकाण 'ट्रेकर्ससाठी नंदनवन' ठरते.

Natural Beauty | google

कसं जाल?

ठाणे स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने तुम्ही या दोन्ही हिल स्टेशनला जाऊ शकता. वन डे पिकनिकसाठी हे लोकेशन मुंबईजवळील सर्वात बेस्ट आहे.

How ​​to Get There? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : मुंबईकरांनो 'विरार'मध्ये लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा, वीकेंडला घ्या घोडेस्वारीचा आनंद

Virar Tourism | saam tv
येथे क्लिक करा...