Shreya Maskar
अर्नाळा बीच हा मुंबई जवळील विरार पश्चिम येथील एक लोकप्रिय काळ्या वाळूचा समुद्रकिनारा आहे, जो त्याच्या शांत वातावरणासाठी, उंट/घोड्यांच्या सफारीसाठी आणि ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यासाठी ओळखला जातो.
वीकेंड पिकनिकसाठी अर्नाळा बीच हे उत्तम लोकेशन आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता. आजूबाजूच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
अर्नाळा बीचवरून नयनरम्य सूर्यास्ताचा सुंदर नजारा दिसतो. तुम्ही येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारू शकता. जेथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येईल.
अर्नाळा किल्ला पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अर्नाळा बीचच्या समोर अरबी समुद्रातील एका बेटावर वसलेला आहे. अर्नाळा किल्ल्याला 'जलदुर्ग' किंवा 'जंजिरे अर्नाळा' असेही म्हणतात.
विरार स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने अर्नाळा बीचपर्यंत जाऊ शकता. हा बीच प्री - वेडिंग शूटसाठी देखील खूपच खास आहे.
अर्नाळा बीचच्या किनाऱ्यावर मुलं क्रिकेट, व्हॉलीबॉल , फुटबॉल खेळताना दिसतात. तसेच तुम्ही कुटुंबासोबत येते वीकेंड प्लान करा. वाळूत डोंगर आणि किल्ला बनवण्याची मजाच वेगळी आहे.
अर्नाळा बीचवर गेल्यावर आवर्जून बोटिंगचा आनंद घ्या. तसेच तेथील स्ट्रीट फूड देखील खा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.