Shreya Maskar
वसई किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या 'बसीन किल्ला' किंवा 'फोर्ट बासायम' म्हणून ओळखले जाते. हा किल्ला १६ व्या शतकातील आहे. हा वास्तू कलेचा सुंदर नमुना आहे.
तुम्हाला जवळून प्राणी-पक्षी पाहायचे असतील तर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याला भेट द्या. येथे डोंगरांमध्ये तुंगारेश्वर मंदिर देखील वसलेले आहे.
भुईगाव बीच वसईजवळ असलेला एक शांत, सुंदर आणि तुलनेने कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या शांत वातावरणासाठी, सुरूच्या झाडांसाठी आणि मनमोहक सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
अर्नाळा किल्ला, ज्याला 'जलदुर्ग' किंवा 'जंजिरे अर्नाळा' असेही म्हणतात, हा पालघर जिल्ह्यातील वसईजवळ अरबी समुद्रातील बेटावर वसलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे.
वसईजवळ महाराष्ट्रातील प्रसिद्ध जीवदानी मंदिर आहे. हे देवीचे इच्छापूर्ती मंदिर आहे. मंदिराला १००० हून अधिक पायऱ्या आहेत.
अर्नाळा किल्ल्याजवळ अर्नाळा बीच आहे. जो त्याच्या शांत वातावरण, काळी रेती, नारळी-पोफळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे कुटुंबासोबत ट्रिप प्लान करू शकता.
वसई जवळील चिंचोटी धबधबा हा घनदाट जंगलाच्या मध्यभागी असलेला एक पांढराशुभ्र आणि निसर्गसौंदर्याने नटलेला धबधबा आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.