Shreya Maskar
जबलपूर, मध्य प्रदेशातील एका टेकडीवर वसलेला मदन महल किल्ला वसलेला आहे. हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
मदन महल किल्ला १११६ मध्ये गोंड शासक राजा मदन शाह यांनी बांधला. मदन महल किल्ला कदाचित गोंडवाना शासकांसाठी एक टेहळणी बुरूज किंवा मोक्याचे लष्करी ठाणे असावे.
मदन महल किल्ल्यामध्ये लहान खोल्या, घोड्यांचे तबेले आणि शहराचे विहंगम दृश्य दाखवणारा मुख्य टेहळणी बुरूज यांचा समावेश आहे.
मदन महल किल्ला विहंगम दृश्यांसाठी, राणी दुर्गावती यांच्या शौर्याशी असलेल्या संबंधासाठी आणि येथील खडबडीत, नैसर्गिक दगडी परिसरासाठी ओळखला जातो.
मदन महल किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. हा ११ व्या शतकातील किल्ला आहे. येथे इतिहासाची उजळणी होईल.
ही वास्तू सध्या बऱ्याच अंशी भग्नावस्थेत आहे. मात्र प्राचीन इतिहासाच महत्त्वाचा घटक आहे.
मध्य प्रदेश येथे खजुराहोची मंदिरे, सांचीचे स्तूप आणि भीमबेटकाची शैलाश्रये ही तीन ऐतिहासिक वास्तू आहेत. तसेच ग्वाल्हेरसारखे भव्य किल्ले आणि मांडू येथील राजवाडेही पाहायला मिळतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.