Kharghar Tourism : वीकेंडला थेट पनवेल गाडी पकडा अन् 'खारघर' ला पोहचा, पाहा 'ही' निसर्गरम्य ५ पर्यटन स्थळे

Shreya Maskar

खारघर हिल्स

खारघर हिल्स ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. पक्षी निरीक्षणासाठी आणि शहराच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

Kharghar Hills | google

सागर विहार पार्क

वाशी खाडीच्या काठावर सागर विहार पार्क वसलेले आहे. कौटुंबिक सहली, फेरफटका मारणे आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे उत्तम लोकेशन आहे.

Sagar Vihar Park | google

मिनी सीशोर

वाशीपासून १.९ किमी अंतरावर मिनी सीशोर आहे. सेक्टर १० मधील हे एक लोकप्रिय 'हँगआउट' ठिकाण आहे. तलावाच्या सान्निध्यात, संध्याकाळी येथे निवांत वेळ घालवू शकता.

Mini Seashore | google

नेरुळ तलाव-उद्यान

नेरुळ तलाव-उद्यान हे येथील समृद्ध पक्षी जीवन आणि शांत, प्रसन्न वातावरणासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही सुंदर फोटोज काढू शकता. ऑफिसवरून आल्यावर निवांत फेरफटका मारू शकता.

Nerul Lake-Garden | google

सीवूड्स फ्लेमिंगो पॉइंट

सीवूड्स फ्लेमिंगो पॉइंटला गेल्यावर तुम्हाला फ्लेमिंगो पक्ष्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत या ठिकाणाला भेट देणे सर्वोत्तम ठरते.

Seawoods Flamingo Point | google

सेंट्रल पार्क

खारघर येथे सेंट्रल पार्क आहे. हे आशियातील सर्वात विशाल उद्यानांपैकी एक आहे. हे ठिकाण हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Central Park | google

वीकेंड प्लान

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही वीकेंडला येथे ट्रिप प्लान करू शकता. ही सर्व ठिकाणे पनवेल जवळील शांत आणि सुंदर पिकनिक स्पॉट्स आहेत.

Weekend Plans | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Kharghar | google

NEXT : मुंबईकरांनो उन्हाने हैराण झालाय? 'ही' ५ हिल स्टेशन्स देतील गारवा, आजच करा ट्रिपचा प्लान

Mumbai Tourism | saam tv
येथे क्लिक करा...