Mumbai Tourism : मुंबईकरांनो उन्हाने हैराण झालाय? 'ही' ५ हिल स्टेशन्स देतील गारवा, आजच करा ट्रिपचा प्लान

Shreya Maskar

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर आर्थर सीट आणि वेण्णा तलावासारख्या ठिकाणांसाठी ओळखले जाते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.

Mahabaleshwar | pinterest

पाचगणी

पाचगणी सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण पाच टेकड्यांनी वेढलेले आहे. येते स्ट्रॉबेरीची शेती होते.

Panchgani | pinterest

माथेरान

माथेरान एक पर्यावरणपूरक, वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण आहे. जिथे शांत पायवाटा आणि दऱ्यांची सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.

Matheran | pinterest

इगतपुरी

इगतपुरी हे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. जिथे धबधब्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. इगतपुरी नाशिक येथे आहे.

Igatpuri | pinterest

भंडारदरा

भंडारदरा हे महाराष्ट्राच्या सह्याद्री रांगेतील एक प्रसिद्ध, शांत हिल स्टेशन आहे. जे ऐतिहासिक विल्सन धरण, आर्थर तलाव आणि रंधा आणि अंब्रेला फॉल्स सारख्या भव्य धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Bhandardara | pinterest

अलिबाग

अलिबाग येथे सुंदर समुद्रकिनारे आहेत. जेथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच येथे साहसी जलक्रीडा देखील करता येतात. येथे ऐतिहासिक किल्ले देखील आहे.

Alibaug | pinterest

माळशेज घाट

माळशेज घाट हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेला एक सुप्रसिद्ध घाट असून, हे ठिकाण चित्तथरारक धबधबे, हिरवीगार निसर्गदृश्ये आणि धुक्याने आच्छादलेल्या टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Malshej Ghat | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Mumbai | pinterest

NEXT :  मे महिन्यात लाँग ट्रिप प्लान करताय? 'ही' आहेत भारतातील बजेट फ्रेंडली सुपरकूल ठिकाणं

Summer Trip | pinterest
येथे क्लिक करा...