मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

MLA PA And Driver Salary Hike: महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. PA चे मानधन 30 हजारांवरून 40 हजार, तर वाहनचालकांचे मानधन 20 हजारांवरून 30 हजार करण्यात आले आहे.
MLA PA And Driver Salary Hike
MAHARASHTRA MLA PA AND DRIVER SALARY HIKE; PA GETS ₹40,000 AND DRIVER ₹30,000saam tv
Published On
Summary
  • आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात मोठी वाढ

  • स्वीय सहाय्यकांचे मानधन ₹३० हजारांवरून ₹४० हजार रुपये झाले आहे.

  • वाहनचालकांचे मानधन ₹२० हजारांवरून ₹३० हजार रुपये करण्यात आले आहे.

गणेश कवडे,साम प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ दि. १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

MLA PA And Driver Salary Hike
३२६ खासदार, १४ राज्यांतील मुख्यमंत्र्यांवर फौजदारी गुन्हे: सर्वोच्च न्यायालयात अहवाल दाखल

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६ मधील तरतुदींनुसार विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांना त्यांचे विधिमंडळाचे प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी स्वीय सहाय्यकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

MLA PA And Driver Salary Hike
Maharashtra Politics: भाजपची कार्यकारिणी बदलताच एकनाथ शिंदेंनीही बोलावली खासदारांची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

विधीमंडळ सदस्यांच्या वेतन व भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार स्वीय सहाय्यकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com