Maharashtra Politics: भाजपची कार्यकारिणी बदलताच एकनाथ शिंदेंनीही बोलावली खासदारांची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

Eknath Shinde Call MPs Meeting : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत फेरबदल झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
BJP RESHUFFLE EK NATH SHINDE CALLS SHIV SENA MPS MEETING AMID CABINET EXPANSION BUZZ
BJP RESHUFFLE EK NATH SHINDE CALLS SHIV SENA MPS MEETING AMID CABINET EXPANSION BUZZsaam tv
Published On
Summary
  • भाजपच्या कार्यकारिणीतील फेरबदलानंतर एकनाथ शिंदेंनी खासदारांची बैठक बोलावली

  • केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान शिंदे गटाच्या खासदारांची बैठक

  • एकनाथ शिंदे शिवसेना खासदारांसोबत कोणता मोठा निर्णय घेणार

एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये फेरबदल झालाय. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज उलटफेर करण्यात आला. लागलीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांनी जोर धरलाय. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील सर्व खासदारांची बैठक बोलावलीय. त्यामुळे अनेक खासदारांची धडधड वाढली असून शिंदे कोणता मोठा निर्णय घेणार? अशी प्रश्नार्थक चर्चा सुरू झाली आहे.

BJP RESHUFFLE EK NATH SHINDE CALLS SHIV SENA MPS MEETING AMID CABINET EXPANSION BUZZ
भाजप 48, शिंदेगट 29, राष्ट्रवादी 22; पुढील आठवड्यात महामंडळांच वाटप, कोणत्या नेत्यांना मिळणार संधी?

शिंदे गटाने राज्यात ऑपरेशन टायगर राबवत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. स्वतंत्र गट स्थापन केला. त्याचदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीकोनातून केंद्रात हालचाली सुरू आहेत.

BJP RESHUFFLE EK NATH SHINDE CALLS SHIV SENA MPS MEETING AMID CABINET EXPANSION BUZZ
Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळणार मंत्रिपद, बड्या नेत्याचं विधान

ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांपैकी दोघांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळण्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय मंत्र्यानं केलेल्या विधानामुळे शिंदे गटातील नेत्यांची धडधड वाढलीय. सुरुवातील केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप आणि अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या चर्चेदरम्यान शिंदेंनी आपल्या सर्व खासदारांची नंदनवन येथे तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनातच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात हा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील आजी माजी आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे.

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. आता या बैठकीकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता मोठा निर्णय होणार आहेत. पक्षांतर्गत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील भविष्यातल्या जेनझीं मतदारांवर लक्षात ठेवून त्याबद्दलच्या सूचना देण्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com