भाजप 48, शिंदेगट 29, राष्ट्रवादी 22; पुढील आठवड्यात महामंडळांच वाटप, कोणत्या नेत्यांना मिळणार संधी?

Maharashtra Mahayuti Corporation Allocation Formula: महायुती सरकारमधील रखडलेले महामंडळ वाटप आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. भाजपला ४८, शिंदे गटाला २९ आणि राष्ट्रवादीला २२ महामंडळांचा संभाव्य फॉर्म्युला; सप्टेंबरमध्ये नियुक्त्या होण्याची शक्यता.
Maharashtra government corporation allocation expected in September 2026
Maharashtra government corporation allocation expected in September 2026saam tv
Published On

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली तरी विविध शासकीय महामंडळावरील नियुक्तीचा प्रश्न अद्याप अजून रखडलेलाच आहे. मात्र, महामंडळ वाटपाचे हे रेंगाळलेले भिजत घोंगडे आता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. या आठवड्यात महायुतीच्या वरिष्ठ समन्वय समितीची महत्वाची बैठक पार पडणार असून, येत्या सप्टेंबर महिन्यात महामंडळाचे प्रत्यक्ष वाटप होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra government corporation allocation expected in September 2026
ठाकरे गटाचा अंतिम वार! आज सुप्रीम कोर्टात फुटीर आमदारांच्या अपात्रतेवर महासुनावणी, आतापर्यंत नेमकं काय झालं?

महायुतीतील घटक पक्षांमध्ये महामंडळाच्या वाटपाचा फॉर्म्युला आधीच निश्चित झाला असला तरी प्रत्यक्षात पदांचे वाटप काळापासून रखडलेले होते. यामुळे सत्ताधारी पक्षांतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत होती. यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी समन्वय समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती मिळत आहे.

Maharashtra government corporation allocation expected in September 2026
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात घटनाक्रम सादर; सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स

महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला:

भारतीय जनता पक्ष : ४८ महामंडळे (मित्रपक्षासह १ अतिरिक्त)

शिवसेना (शिंदे गट): २९ महामंडळे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): २२ महामंडळे

Maharashtra government corporation allocation expected in September 2026
Shiv Sena UBT: उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा? याचिकेवर सुनावणी होणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य वाटपामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांतील स्थानिक व राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत यासंदर्भातील अधिकृत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाराजी पाहायला मिळत असून विधानपरिषद, मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळाले नाही त्यांची महामंडळावर नियुक्ती केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com