

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याचे संकेत
शरद पवारांनी NDAमध्ये सहभागी व्हावे, असा सल्ला आठवले यांनी दिला.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. ते आज नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्यांचा मंत्रिपदासाठी समावेश असेल. शरद पवार यांनी एनडीए (NDA) मध्ये सामील व्हावे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्या पक्षातील आठ खासदारांनी या एनडीएमध्ये सामील व्हावे, असा सल्लाही आठवले यांनी यावेळी दिला.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, काँग्रेस पक्षाने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कधीही मुख्यमंत्री केले नाही. कदाचित, ते अनुसूचित जातीचे असल्यानेच काँग्रेसने त्यांना कधी मुख्यमंत्री केले नसावं. असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलताना आठवले म्हणाले की, हा विस्तार लवकरच होईल. यासाठी अनेक नावांचा विचार केला जाऊ शकतो. यात काही मंत्री भाजपचे, तर काही राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील.
आठवले यांनी सांगितले की, शरद पवार यांचा पक्ष त्यांच्यासोबत सामील होईल की नाही याबद्दल कोणतीही निश्चित माहिती नसली तरी, शरद पवारांनी एनडीए (NDA) मध्ये सामील व्हायला हवे. त्यांनी म्हटले, "जर जॉर्ज फर्नांडिस सामील होऊ शकत होते, तर तुम्ही का नाही? देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं. त्यांच्याकडे ८ खासदार आहेत, त्यांनी आमच्यासोबत यावं. जर शरद पवार भाजपसोबत येऊ शकत नसतील तर त्यांच्या खासदारांनी एनडीएमध्ये सामील व्हावे.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा आज (१७ ऑगस्ट) करण्यात आली. यात वसुंधरा राजे, राम माधव आणि स्मृती इराणी यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. संघटनेत अनेक माजी आणि विद्यमान नेत्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.