Shehzad Poonawalla : माझ्यासाठी हा अत्यंत भावुक क्षण...; भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Shehzad Poonawalla Resigns BJP : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनाम्यामागील कारणे, पक्षाची भूमिका आणि पुढील वाटचालीबाबत जाणून घ्या.
Shehzad Poonawalla Resigns From BJP
Shehzad Poonawalla Resigns From BJPAI Image
Published On
Summary
  • शहजाद पूनावाला यांचा BJP चा राजीनामा

  • आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे पक्ष सोडल्याचं म्हटलं

  • भाजप सोडल्यानंतर खासगी क्षेत्रात प्रवेश करणार

  • शहजाद पूनावालांचा भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा कायम

एकीकडे देशातील राजकारणात फेरबदल होत असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाचा पुन्हा राजीनामा दिला आहे. देण्याचा गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही घडामोडींमुळे पूनावाला नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत भाजपमधून बाहेर पडण्याची घोषणा केली.

पूनावाला यांनी सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याचे पत्र शेअर केले. पक्षाने सुरुवातीला त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र, चर्चा आणि विचार केल्यानंतर आपण पक्ष सोडण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपल्या पत्रात पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत पक्षाने दिलेल्या संधी, व्यासपीठ आणि जबाबदाऱ्यांसाठी त्यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

Shehzad Poonawalla Resigns From BJP
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

पक्ष सोडण्यामागे अत्यावश्यक आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थिती असल्याचेही पूनावाला यांनी सांगितले. यापुढे आपण खासगी क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राजकीय विचारांच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भूमिकेला शक्य त्या स्वरूपात पाठिंबा देत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.

“मी पक्ष सोडत आहे, पण विचार आणि व्यक्ती नाही,” अशी भूमिका पूनावाला यांनी मांडली. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडल्यानंतरही मोदी आणि भाजपच्या विचारसरणीशी आपली बांधिलकी कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. शहजाद पूनावाला यांनी २०१७ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते भाजपचे आक्रमक आणि चर्चेत राहणारे प्रवक्ते म्हणून ओळखले जाऊ लागले. विविध चर्चांमध्ये ते सातत्याने पक्षाची भूमिका मांडत होते. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com