Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pediatric Cancer : बालकांमधील कर्करोग आणि त्यावरील उपचारांचा डोळे व दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. नियमित नेत्रतपासणी, लक्षणांची लवकप ओळख आणि फॉलोअपमुळे संभाव्य गुंतागुंत व्यवस्थापिक करता येते.
Childhood Cancer
Childhood Cancermeta ai
Published On

जेव्हा एखाद्या मुलाला कर्करोगाचे निदान होते, तेव्हा पालकांचे मुख्य लक्ष साहजिकच आजारावर नियंत्रण मिळवणे आणि उपचार पूर्ण करण्यावर असते. मात्र, बालकांच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये त्यांच्या दीर्घकालीन जीवनमानाचा, त्यात दृष्टी आणि डोळ्यांच्या विकासाचाही समावेश होतो, विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

कर्करोगाचा डोळ्यांवर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. काही बालकांमधील कर्करोग, जसे की रेटिनोब्लास्टोमा, डोळ्यांमध्येच सुरू होतात. त्याचप्रमाणे काही मेंदूतील ट्यूमर, ल्युकेमिया तसेच डोके आणि मानेच्या भागाशी संबंधित कर्करोगांमुळे दृष्टीशी संबंधित अवयवांवर परिणाम होऊ शकतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) च्या मते, ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मेंदूतील ट्यूमर हे बालकांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी आहेत, तर रेटिनोब्लास्टोमा हा बालकांमध्ये आढळणारा महत्त्वाचा डोळ्यांचा ट्यूमर आहे.

Childhood Cancer
Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

कर्करोगावरील उपचारांचाही काही वेळा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. डोके, मेंदू, डोळे किंवा डोळ्यांच्या खोबणीच्या भागावर दिली जाणारी रेडिएशन थेरपी डोळ्यांशी संबंधित समस्यांचा धोका वाढवू शकते. काही विशिष्ट केमोथेरपी औषधे, स्टेरॉइड्स आणि स्टेम-सेल ट्रान्सप्लांटेशनच्या आसपास दिले जाणारे उपचार यामुळे मोतीबिंदू, डोळ्यांचा कोरडेपणा किंवा दृष्टीतील इतर बदल होऊ शकतात.

हे परिणाम उपचार सुरू असतानाच दिसतील असे नाही. काही समस्या उपचारानंतर काही महिने किंवा अगदी काही वर्षांनीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बालपणी कर्करोगावर उपचार घेतलेल्या मुलांच्या दीर्घकालीन वैद्यकीय देखरेखीमध्ये नियमित फॉलो-अप महत्त्वाचा ठरतो.

पालकांनी मुलाच्या दृष्टीमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दृष्टी धूसर होणे किंवा दुहेरी दिसणे, वस्तू पाहण्यात अडचण येणे, प्रकाशाची अधिक संवेदनशीलता, रात्री पाहताना त्रास होणे, डोळे सतत कोरडे किंवा चुरचुरणे, डोळ्यांत वेदना, लालसरपणा किंवा डोळ्यांच्या दिसण्यात अथवा हालचालीत जाणवणारा बदल यांसारखी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.

लहान मुले विशेषतः दृष्टी कमी झाल्याची तक्रार नेहमीच स्पष्टपणे करू शकत नाहीत. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी नेहमीपेक्षा टीव्हीच्या खूप जवळ बसत असेल, वाचन टाळत असेल, वारंवार डोळे बारीक करून पाहत असेल, वस्तूंना धडकत असेल किंवा शाळेतील अभ्यासात अडचणी येत असतील, तर पालकांनी त्याकडेही लक्ष द्यावे.

“बालकांच्या कर्करोगाच्या उपचारांचे उद्दिष्ट केवळ आजार बरा करणे एवढेच नसून, मुलाला पुन्हा निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगता यावे हे देखील आहे. त्यामध्ये दृष्टीचे महत्त्व मोठे आहे. कर्करोगाचा प्रकार आणि दिलेल्या उपचारांनुसार, उपचार सुरू असताना तसेच फॉलो-अपच्या काळात मुलांना नियमित डोळ्यांची तपासणी करून घेण्याचा फायदा होऊ शकतो. दृष्टीमध्ये कोणताही नवीन बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता उपचार करणाऱ्या बालकर्करोग तज्ज्ञांशी चर्चा करणे आवश्यक आहे,” असे M|O|C Cancer Care Mumbai येथील चाइल्डहुड कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. स्वाती कृष्णा यांनी सांगितले.

Childhood Cancer
Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

भारतीय कुटुंबांसाठी हा फॉलो-अप विशेष महत्त्वाचा आहे, कारण बालकांच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये अनेक तज्ज्ञांचा सहभाग असू शकतो. बालकाला बालकर्करोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ आणि आवश्यकतेनुसार न्यूरोलॉजिस्ट किंवा इतर तज्ज्ञांमध्ये समन्वय साधून उपचार घेण्याची गरज भासू शकते.

चांगली बाब म्हणजे कर्करोगावरील उपचार घेणाऱ्या प्रत्येक मुलाला डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होतीलच असे नाही. हा धोका कर्करोगाचा प्रकार, उपचारांचा प्रकार, औषधांची मात्रा आणि मुलाचे वय यानुसार बदलतो. समस्या लवकर ओळखल्यास त्यामागचे कारण शोधून अनेक गुंतागुंतींवर प्रभावीपणे उपचार आणि व्यवस्थापन करता येऊ शकते.

2022 मध्ये जगभरात 2.75 लाखांहून अधिक मुले आणि किशोरवयीन मुलांना कर्करोगाचे निदान झाले. त्यामुळे कर्करोगातून मुलांना वाचवणे हा उद्देश महत्त्वाचा असला, तरी त्यासोबतच कर्करोगातून बरे झालेल्या मुलांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य आणि शक्य तितके चांगले जीवनमान मिळावे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com